कुस्तीपटु सागर राणाच्या हत्या प्रकरणात (Sagar Rana Murder Case) मुख्य आरोपी ऑलिम्पियन कुस्तीपटु सशील कुमारने (Sushil Kumar) तिहार जेल (Tihar Jail) प्रशासनाकडून टीव्हीची मागणी केली आहे. सुशील कुमार यांनी तिहार प्रशासनाला पत्र लिहिले आहे की, “आपल्या सेलमध्ये टीव्ही हवा आहे जेणेकरुन टीव्हीवर जगात काय चालले आहे, ‘विशेषत: कुस्तीबद्दल काय सुरू आहे’ हे तो पाहू शकेल.” म्हणून त्यांनी दिवशी पत्र लिहून तिहार प्रशासनाला टीव्ही देण्याची विनंती केली आहे. (Sushil Kumar has demanded TV in Tihar Jail)
सुशील कुमार हा तिहारच्या जेल नंबर 2 च्या उच्च सुरक्षा कक्षात आहे. तुरूंगातील नियमावलीनुसार त्यांना तुरूंगात वृत्तपत्रे दिली जात आहेत, पण टीव्हीच्या मागणीबाबत तिहार प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. याआधीही सुशीलने तुरूंग प्रशासनाकडे चांगल्या आहाराची मागणी केली होती, त्यास कोर्टाने व तुरूंग प्रशासनाने फेटाळून लावले होते.
दरम्यान, ऑलिम्पिक पदकविजेते सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांनी कुस्तीगीर सागर राणाला लाठ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता.त्या व्हिडिओमध्ये, रक्ताने माखलेला सागर जमिनीवर पडलेला दिसतो आहे.गंभीर मारहाणीमुळे नंतर पैलवा सागर राणाचा मृत्यू झाला.सुशील कुमारने 2020च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक व 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.