

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली. येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे या मृतदेहाचे शीर, दोन्ही हात आणि दोन्ही पाय पूर्णपणे गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही भीषण घटना समोर आल्यानंतर संभल जिल्ह्यासह चंदौसी कोतवाली परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले. मृतदेहाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही, त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.
दरम्यान, ही सनसनाटी घटना सोमवारी (15 डिसेंबर) संभलच्या चंदौसी कोतवाली क्षेत्रातून समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतरुआ रोडवर असलेल्या मोठ्या ईदगाहजवळ सकाळी हा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना (Police) याची माहिती दिल्यावर पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह केवळ धडाच्या स्वरुपात होता. शरीराचे अन्य मुख्य अवयव म्हणजेच शीर, दोन्ही हात आणि दोन्ही पाय मृतदेहाजवळ नव्हते. शरीराचे महत्त्वाचे भाग गायब झाल्याने हा मृतदेह विकृत अवस्थेत होता. यामुळे हा मृतदेह नेमका कोणत्या व्यक्तीचा आहे, हे ओळखणे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. दुसरीकडे, मृतदेह कोणाचा आहे, हे निश्चित होत नसल्यामुळे हा खून आहे की आणखी काही याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
संभलमध्ये घडलेल्या या घटनेनंतर तपासाची चक्रे वेगाने फिरु लागली आहेत. चंदौसीचे पोलीस क्षेत्राधिकारी मनोज कुमार सिंह यांनी या संदर्भात निवेदन दिले. मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, "सध्या या प्रकरणाची नेमकी परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. मृतदेहाचे अवयव गायब झालेले आहेत. त्यामुळे या शरीराला एखाद्या जनावराने नुकसान पोहोचवले आहे, की हा काही क्रूर खून किंवा अन्य दुर्घटना आहे, याबाबत तपास सुरु आहे. आम्ही सध्या मृताची ओळख पटवण्यावर आणि घटनेच्या नेमक्या परिस्थितीचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत."
पोलिसांनी मृतदेहाच्या अवयवांचा शोध घेण्यासाठी परिसराची कसून तपासणी सुरु केली आहे. तसेच, शहरातील आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांमध्ये मागील काही दिवसांत दाखल झालेल्या गायब लोकांच्या नोंदीही तपासल्या जात आहेत, जेणेकरुन मृतदेहाची ओळख पटवणे शक्य होईल.
पोलिसांनी सांगितले की, अवयव विरहित हा मृतदेह पुढील तपासणीसाठी शवगृहात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळाची तपासणी करताना पोलिसांना मृतदेहाजवळ एक बॅग देखील मिळाली. ती बॅग खूपच वाईट अवस्थेत होती, ज्यामुळे ती तिथे बऱ्याच दिवसांपासून पडून असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेतली आहे. त्या बॅगेमध्ये मृत व्यक्तीशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे मिळतात का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या अत्यंत संवेदनशील प्रकरणात आवश्यक कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशा प्रकारे मृतदेहाचे अवयव गायब असणे, हे अत्यंत गंभीर गुन्ह्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे पोलीस या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने पाहत असून लवकरात लवकर या गूढ प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.