Crime News: गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! 50 वर्षीय शिक्षकानं वर्गातच केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; शिक्षण विभागाची कडक कारवाई

UP Ballia School Teacher Suspended: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली.
UP Ballia School Teacher Suspended
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

5th Grade Student Harassment: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली. जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या अवघ्या पाचवीच्या विद्यार्थिनीचा एका 50 वर्षीय शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. आरोपी शिक्षकाने चिमुकलीसोबत अत्यंत आक्षेपार्ह आणि लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप असून, ही बातमी पसरताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आरोपी शिक्षकाला तात्काळ निलंबित केले.

जिल्हा शिक्षण अधिकारी मनीष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसंतपूर येथील कंपोजिट शाळेतील शिक्षक मनोज राय याच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली. 1 सप्टेंबर रोजी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आपला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. या अहवालात शिक्षकावर 5वीच्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचे आरोप प्रथमदर्शनी खरे असल्याचे स्पष्ट झाले.

UP Ballia School Teacher Suspended
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

पीडित चिमुकलीने आपल्या निवेदनात आरोपी शिक्षक मनोज राय याचे नाव घेत, त्याने आपला छळ केल्याचे व अश्लील हरकत केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, वर्गातील इतर विद्यार्थ्यांनीही पीडित मुलीच्या तक्रारीला दुजोरा देत आरोपी शिक्षकाचे हे काळे कृत्य उघडे पाडले. निष्पाप विद्यार्थ्यांच्या या साक्षीनंतर शिक्षण विभागाने शिक्षकाला सेवेतून तात्काळ निलंबित करुन त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सिकंदरपूरच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

UP Ballia School Teacher Suspended
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच केली लिंगबदल शस्त्रक्रिया, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थिनींची छेडछाड आणि गैरवर्तन होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच कुशीनगरमध्येही एका कोचिंग सेंटरमध्ये छेडछाड करणाऱ्या शिक्षकाला एका विद्यार्थिनीने चपलेने बदडले होते आणि संतप्त जमावाने शिक्षकाला थुंकून चाटायला लावल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या पाठोपाठ आता बलिया जिल्ह्यातील या घृणास्पद प्रकारामुळे सरकारी शाळांमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com