Viral Video: देवाच्या गाभाऱ्यात शिरला अन् लोखंडी रॉडने पेटी फोडून रोकड केली लंपास, चोरट्याचा व्हिडिओ व्हायरल; यूजर्स म्हणाले, "ज्याला देवाची भीती उरली नाही, त्याला...''

Amroha Temple Theft Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात.
Amroha Temple Theft Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Amroha Temple Theft Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. कधी गल्लीबोळातून दुचाकी चोरतानाचे, तर कधी महागड्या गाड्या लंपास करतानाचे चोरट्यांचे व्हिडिओ आपण पाहतो. मात्र, आता एका अशा चोराचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने चक्क देवाच्या चरणी अर्पण केलेली दानपेटीही सोडली नाही. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका मंदिरात चोरी करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून चोराचा निर्लज्जपणा पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

नेमकी घटना काय?

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती शांततेत मंदिरात प्रवेश करताना दिसते. सुरुवातीला तो इकडे-तिकडे पाहत कुणी नसल्याची खात्री करतो. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली जड दानपेटी तो उचलतो आणि जमिनीवर ठेवतो. ही दानपेटी फोडण्यासाठी त्याने आधीच तयारी केली होती. त्याने सोबत आणलेल्या लोखंडी रॉडच्या साहाय्याने दानपेटीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर कुलूप तुटताच, त्याने पेटीतील सर्व रोकड घाईघाईने काढून स्वतःच्या खिशात भरली.

Amroha Temple Theft Video
Viral Video: बाप की वैरी? रेल्वेच्या खिडकीबाहेर चिमुकल्याला लटकवलं, प्रवाशाचा संतापजनक प्रकार व्हायरल; यूजर्स म्हणाले, ''देशात अशा नमुन्यांची कमी नाही...''

चोराची 'स्मार्ट'गिरी पडली महाग

या चोरीमध्ये एक विशेष गोष्ट लक्षात आली ती म्हणजे चोराने हाताचे ठसे (Fingerprints) उमटू नयेत यासाठी हातमोजे (Gloves) घातले होते. यावरुन त्याने नियोजनबद्ध चोरी केल्याचे स्पष्ट होते. मात्र, एवढी खबरदारी घेणाऱ्या चोराला मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरा असेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. त्याने आपले तोंड झाकले नसल्यामुळे त्याचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. आता हाच व्हिडिओ त्याच्या अटकेसाठी सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे.

अमरोहा पोलिसांची तत्परता

हा व्हिडिओ 'एक्स'वर '@gharkekalesh' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अमरोहा पोलिसांनी याची तातडीने दखल घेतली. पोलिसांनी या पोस्टवर अधिकृत कमेंट करत माहिती दिली की, "या प्रकरणाच्या संदर्भात अमरोहा देहात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले जात असून लवकरच या गुन्ह्याचा छडा लावला जाईल. सध्या परिसरात शांतता असून कायदेशीर कारवाई सुरु आहे."

Amroha Temple Theft Video
Viral Video: 'कांड' करायला गेला अन् भलतचं होऊन बसलं! चिमुरड्याचा निशाणा चुकला आणि आजोबांना बसला जबरदस्त फटका; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

मंदिरासारख्या (Temple) पवित्र ठिकाणी चोरी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडियावरील यूजर्समध्ये संतापाची लाट आहे. "ज्याला देवाची भीती उरली नाही, त्याला कायद्याचा धाक तरी कसा असणार?" अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून चोराला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com