जहांगीर परिसरात ड्रोनचा वापर; सुरक्षा दलांचा फौज फाटा तैनात

पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असून, त्यादरम्यान रात्री आकाशातून ड्रोनद्वारे राखण केली जात आहे.
Jehangir Area
Jehangir AreaDainik Gomantak
Published on
Updated on

शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) झालेल्या हिंसाचारामुळे प्रभावित दिल्लीच्या (Delhi) जहांगीरपुरी भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असून, त्यादरम्यान रात्री आकाशातून ड्रोनद्वारे राखण केली जात आहे. राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीला झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 24 आरोपींना अटक केली. (Use of drones in Jehangir area Security forces deployed)

Jehangir Area
जहांगीरपुरी हिंसाचाराला कशी झाली सुरूवात

या हिंसाचारात सहभागी दोन अल्पवयीन मुलेही पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी, हिंसाचारग्रस्त भागात पोलीस दल तैनात करण्याबरोबरच केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफ आणि आरएएफच्या आणखी पाच तुकड्या पाठवल्या आहेत.

जहांगीरपुरी हिंसाचाराच्या ताज्या अपडेट्सः

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 16 एप्रिलच्या दिल्ली जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. या घटनेप्रकरणी आतापर्यंत एकूण 23 जणांना आपल्या ताब्यात घेतले असून दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात आठ पोलीस कर्मचारी तसेच एका नागरिकासह नऊ जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनचा वापर करत जामा मशीद आणि हौज काझी भागावर नजर ठेवली आहे.

हिंसाचारग्रस्त भागात सुरक्षा दलांची गस्त

सुरक्षा दल संपूर्ण परिसरात गस्त घालत आहेत तर संशयित लोकांवर पाळत देखील ठेवली जात आहे. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सोनू नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली. या हिंसाचारात आठ पोलिस आणि एका नागरिकासह नऊ जणांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 25 जणांना पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन किशोरवयीन देखील आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी आणि विश्व हिंदू परिषदेचा (व्हीएचपी) स्थानिक नेता प्रेम शर्मा यांची चौकशी केली आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हिंसाचारामागे कोण आहेत हे ओळखण्यासाठी ते 200 हून अधिक व्हिडिओ तपासत गेले आहेत. अस्थाना म्हणाले की, 16 एप्रिलच्या चकमकीच्या तपासासाठी 14 पथके उभारण्यात आली आहेत. जातीय चकमकींवरून राजकीय पक्षांच्या हल्ल्यात आलेले दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सोमवारी सांगितले आहे की, हिंसक चकमकींमध्ये सहभागी असलेल्यांना त्यांचा वर्ग कोणताही असो, त्यांना सोडले जाणार नाहीये.

Jehangir Area
अंगारकी चतुर्थीचे जाणून घ्या महत्त्व

जहांगीरपुरीमध्ये ड्रोनद्वारे पाळत

दिल्ली पोलिसांनी सोमवारी हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीच्या आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवला गेला आहे. शनिवारी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात लोकांमध्ये जातीय हिंसाचार पसरला होता. या क्षेत्रावर कडेकोट नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे आणि राष्ट्रीय राजधानीच्या अशांत उत्तर-पश्चिम भागात पोलिस रस्त्यावर गस्त घालताना दिसत आहेत. चकमकीच्या दोन दिवसांनंतर, दिल्ली पोलिसांनी मान्य केले की हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या तिसऱ्या हनुमान जयंती मिरवणुकीला प्रशासकीय परवानगी दिली नव्हती. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सोनू नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या हिंसाचार प्रकरणात आठ पोलिस आणि एका नागरिकासह नऊ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 25 जणांना अटक करण्यात आली तर त्यामध्ये दोन किशोरवयीन आहेत.

मशिदीवर भगवा ध्वज फडकवण्याची चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्टीकरणही दिल्ली पोलिसांनी दिले. तर दिल्ली पोलिसांच्या अहवालानुसार, या प्रकरणातील आतापर्यंतचा समोर आलेले व्हिडिओ, शस्त्र बाळगण्याच्या घटनांची तसेच सर्व प्रकारची फॉरेन्सिक बॅलिस्टिक तपासणी केली जात आहे, ज्याच्या आधारे लोकांची पूर्ण ओळख पटल्यानंतरच त्यांना अटक केली जाणार आहे.

या प्रकरणात गुन्हेगारी कट रचण्याचे कलम 120बी देखील लावण्यात आले आहे. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चौकशी व्हावी यासाठी हे कलम लावण्यात आले की, दंगल करणाऱ्या लोकांच्या मागे नेमके कोणाचे लक्ष होते आणि कोणाचा हात होता. लक्षात ठेवा, शनिवारी संध्याकाळी जहांगीरपुरी भागात एका मिरवणुकीदरम्यान दोन पक्षांमध्ये वाद झाला, त्यानंतर परिसरात हिंसाचार झाला आणि प्रचंड दगडफेक करण्यात आली.

Jehangir Area
जम्मू पोलिसांची मोठी कारवाई, 54 राऊंड पिस्तुलांसह स्फोटकांचा मोठा साठा जप्त

यासोबतच या प्रकरणात गोळ्या देखील झाडण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये दिल्ली पोलिसांचा 1 सहायक उपनिरीक्षकही जखमी झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांची ओळख पटली, परंतु दगडफेक, लोकांवर हल्ले करणे किंवा गोळीबार करण्यात सहभागी असलेल्यांनाच अटक केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com