Urfi Javed: "रात्रभर झोपले नाही, 10 मिनिटं त्या दोघांनी..." उर्फी जावेदसोबत गैरवर्तन, अज्ञात व्यक्तींचा धुमाकूळ

Urfi Javed News: आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद सध्या एका अत्यंत भयावह प्रसंगातून जात आहे.
Urfi Javed
Urfi JavedDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद सध्या एका अत्यंत भयावह प्रसंगातून जात आहे. सोमवारी (२२ डिसेंबर) मध्यरात्री उर्फीच्या घरी काही अज्ञात व्यक्तींनी जबरन शिरण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे उर्फी प्रचंड घाबरली असून, तिने आपल्या बहिणींसह तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं त्या रात्री?

उर्फीने दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबरच्या रात्री साधारण ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. ती गाढ झोपेत असताना अचानक तिच्या घराची बेल सतत वाजू लागली. सुरुवातीला तिला वाटले की कोणीतरी चुकून बेल दाबली असेल, मात्र सुमारे १० मिनिटे सतत बेल वाजत राहिल्याने ती सतर्क झाली. जेव्हा तिने दरवाजाच्या लेन्सधून बाहेर पाहिले, तेव्हा तिला दोन अनोळखी व्यक्ती तिथे उभे असल्याचे दिसले.

उर्फीचा थरकाप उडवणारा अनुभव

उर्फीने 'ई-टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या व्यक्तींपैकी एक जण सातत्याने दरवाजा उघडण्याची आणि त्याला आत घेण्याची मागणी करत होता, तर दुसरी व्यक्ती कोपऱ्यात उभी राहून पाळत ठेवत होती. उर्फीने त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले, मात्र त्यांनी तिथून हलण्यास नकार दिला. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उर्फीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

Urfi Javed
Goa Politics: गोविंद गावडेंच्या बालेकिल्ल्याला तडा! अपक्ष जल्मी विजयी; खांडोळ्यात नेते निष्प्रभ - कार्यकर्ते निर्णायक

पोलिसांसमोरही उद्धट वर्तन

धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही त्या दोन्ही तरुणांची भीती कमी झाली नाही. उर्फीने सांगितले की, "जेव्हा पोलिसांनी त्यांना हटकले, तेव्हा ते पोलिसांशी आणि आमच्याशी अत्यंत उद्धटपणे वागू लागले. ते 'निघ इथून' असे ओरडत होते आणि तिथून जाण्यास तयार नव्हते." या घटनेमुळे आपण रात्रभर झापेले नाही, असं तिने म्हटलंय.

Urfi Javed
Goa ZP Election Result: 'जनतेने भाजप सरकार, मोदींवरील विश्‍‍वास पुन्‍हा सार्थ ठरवला'! CM सावंतांचे प्रतिपादन; भाजपचा विजयोत्सव

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे उर्फी प्रचंड अस्वस्थ आहे. ती म्हणाली, "जेव्हा एखादी मुलगी एकटी राहत असते आणि रात्रीच्या ३ वाजता अनोळखी लोक दरवाजा ठोठावून आत येण्याचा प्रयत्न करतात, तो अनुभव शब्दांत सांगता येणार नाही इतका भयानक असतो." उर्फीने आता पोलिसांकडे ठोस कारवाईची मागणी केली असून, तिला आपल्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. सोशल मीडियावर तिचे चाहतेही या घटनेमुळे संताप व्यक्त करत असून तिच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com