Ayodhya: प्रभू रामाच्या अयोध्येत काळा धंदा, महाराष्ट्र - गोव्यात सिंथेटिक ड्रग्सची तस्करी; UP पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Uttar Pradesh Crime: अयोध्येतील रौनाही भागातील मारिया किड्स अँड गारमेंट्सच्या गोदामात अवैध सिंथेटिक ड्रग्स बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली.
UP Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेश: पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) सिंथेटिक ड्रग्सची निर्मिती आणि तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. एसटीएफने या टोळीतील दोन आरोपींना अयोध्येतून अटक केली आहे.

त्यांच्याकडून सुमारे 812 ग्रॅम सिंथेटिक ड्रग मेफेड्रोन (MD) आणि ते तयार करण्यासाठी वापरले जाणारे इतर रसायने जप्त करण्यात आली आहेत. मोहम्मद कयूम (रा. अयोध्या) आणि बिपीन बाबू लाल पटेल (गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यूपी एसटीएफ टीमला अनेक दिवसांपासून पूर्वांचलच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणारे गुन्हेगार सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, एसटीएफला महाराष्ट्र ठाण्याच्या एएनटीएफकडून माहिती मिळाली की मोहम्मद, अंमली पदार्थ कायद्यांतर्गत त्यांना हवा असलेला आरोपी आहे.

कयूम हा अयोध्या जिल्हा आणि आसपासच्या परिसरात लपून राहत आहे. कयूम हा अमली पदार्थांच्या तस्करांच्या संगनमताने सिंथेटिक ड्रग्ज तयार करून महाराष्ट्र आणि गोव्यासह अनेक राज्यात पुरवत होता, अशीही माहिती मिळाली.

UP Crime News
Goa Weather Update: सत्तरी, धारबांदोड्याला पाऊस झोडपणार? 'कोसळधार' बरोबर वादळी वाऱ्याची शक्यता

अयोध्येतील रौनाही भागातील मारिया किड्स अँड गारमेंट्सच्या गोदामात अवैध सिंथेटिक ड्रग्स बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. या माहितीवरून कारवाई करत रविवारी दोन आरोपींना अटक करण्यात आलीय.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 812 ग्रॅम मेफेड्रोन एमडी, 10 लिटर एम.ई.के. रासायनिक, 2 लिटर ॲसिटोन, 500 मि.ली. ब्रोमाइनसह एमडी बनवण्याची उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

एसटीएफने केलेल्या चौकशीत या आरोपींची अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये एक संघटित टोळी असल्याचे उघड झाले. बेकायदेशीर ड्रग मेफेड्रोन (MD) तयार करतात आणि गोवा, मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक राज्यांना पुरवत असल्याचे उघड झाले आहे.

UP Crime News
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना 'अल्टीमेटम', भारत न सोडल्यास 3 लाख रुपये दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा

या टोळीचा म्होरक्या मोहम्मद कयूम आहे. अयोध्येतील रौनाही भागातील सोहवाल येथे असलेल्या गोदामात बेकायदेशीर ड्रग मेफेड्रोन (MD) तयार करतो. मो. कयुम हा रौनाही पोलिस स्टेशनचा हिस्टरी -शिटर गुन्हेगार आहे आणि 2021 मध्ये, त्याला STF ने इंदिरा नगर, लखनौ येथून 2.50 किलो अवैध ड्रग मेफेड्रोन (MD) सह अटक करण्यात आली होती.

यातील आरोपी बिपीन बाबूलाल पटेल याने रसायनशास्त्रत एम.एस्सी केली असून, तो कयूमच्या टोळीचा प्रमुख सदस्य आहे. तो केमिकल्सपासून एमडी बनवतो आणि या कामात तज्ज्ञही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com