UP Crime News: पोटचा गोळा झाला सैतान! किरकोळ वादातून आई अन् बहिणीची कत्तल

Crime News: आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुन्हा करण्यापूर्वी आरिफने पत्नी आणि मुलांना दुसरीकडे पाठवले होते.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

UP Man Slaughtered Mother and Sister in Prayagraj: उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. करेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करेली परिसरात एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या आई आणि बहिणीची हत्या केली आणि वडिलांना धारदार शस्त्रांनी गंभीर जखमी केले.

मोहम्मद आरिफ असे आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अनीसा बेगम (६५) आणि निखत जहाँ उर्फ नाहिर फातिमा (३३) अशी मृत महिलांची नावे आहेत, दोघीही करेली येथील रहिवासी आहेत. जखमी व्यक्तीचे वडील मोहम्मद कादिर (70) निवृत्त सरकारी अधिकारी आहेत.

पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत असताना आरोपीने त्यांच्यावर अॅसिडच्या बाटल्या फेकल्या, त्यात एसीपी श्वेताभ पांडे यांच्यासह चार पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

Crime News
No Confidence Motion: विरोधकांनी काढला हुकमी एक्का; मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार

तरुणाने घरगुती गॅस सिलेंडरने घराचा एक भाग देखील पेटवला होता. यावेळी घरातून पोलिसांनी तीन धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये एक कुऱ्हाड आणि दोन चाकूंचा समावेश आहे. ही शस्त्रे हत्येसाठी वापरलेली होती.

करेलीचे पोलीस अधिक्षक श्वेताभ पांडे यांनी सांगितले, "आरोपी, मोहम्मद आरिफचा त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी वाद झाला आणि त्यानंतर त्याच्या आई-वडिलांवर आणि बहिणीवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यावेळी आरिफच्या मोठ्या भावासह कुटुंबातील इतर सदस्य घराच्या दुसऱ्या बाजूला धावले.

पोलीस अधिक्षक म्हणाले की, गुन्हा करण्यापूर्वी आरिफने पत्नी आणि मुलांना दुसरीकडे पाठवले होते. पोलीस आरोपींची सखोल चौकशी करतील असेही त्यांनी सांगितले.

Crime News
Mumbai High Court: व्यापाऱ्याला 35 वर्षांनी न्याय; ईडीने जप्त केलेले पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश

पोलिसांनी सांगितले की, "प्राथमिक पोलिस तपासात असे समोर आले आहे की आरोपीने काही कौटुंबिक वादानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांना संपवण्याचा कट रचला होता.

घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना आढळून आले की आरोपीने पुरेशा प्रमाणात अॅसिडच्या बाटल्या, दोन ते तीन चाकू आणि शस्त्रांचा साठा आपल्या कुटुंबीयांना संपवण्यासाठी केला होता."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com