Adipurush Controversy: "काही गोष्टींना तुम्ही हात लावायला नको होता; हायकोर्टाने लेखक, निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डालाही फटकारले

Adipurush: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले.
Adipurush Controversy
Adipurush ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

Adipurush Movie: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला होता. या चित्रपटातील संवादांवर प्रेक्षकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी वादग्रस्त संवादही बदलले आहेत. तरीही चित्रपटाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले. यासोबतच सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत सेन्सॉर बोर्डानेही आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुनताशीर शुक्ला यांनाही नोटीस बजावली आहे. यासोबतच मनोज मुंतशीर यांना आठवडाभरात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

या चित्रपटात वापरलेले संवाद हा एक मोठा मुद्दा आहे. रामायण हे लोकांसाठी उदाहरण आहे, रामायण पूजनीय आहे. आजही लोक रामचरितमानस वाचून घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत काही गोष्टींना हात लावायला नको होता. चित्रपटात भगवान हनुमान आणि माता सीता कशाप्रकारे दाखवण्यात आल्या आहेत, हे कोणीही समजू शकत नाही. चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी कायदा आणि सुव्यवस्था मोडली नाही हे चांगले आहे. या विषयाचे गांभीर्य बहुधा निर्मात्यांना समजले नसेल.
लखनऊ खंडपीठ, अलाहाबाद उच्च न्यायालय
Adipurush Controversy
Punjab and Haryana High Court: "महिलेच्या आत्महत्येस सासरचेच जबाबदार असतील असे नाही"; आरोपींना मुक्त करत, कोर्ट म्हणाले...

हे स्टार्स चित्रपटात

'आदिपुरुष'मध्ये अभिनेता प्रभासने श्रीरामची भूमिका साकारली आहे, क्रिती सेनॉनने सीतेची भूमिका केली आहे आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत. मात्र, या चित्रपटाबाबतचा गोंधळ लक्षात घेता त्याचे वादग्रस्त संवाद बदलण्यात आले आहेत.

सेन्सॉर बोर्डाला सवाल

वरिष्ठ वकील रंजना अग्निहोत्री यांनी चित्रपटाशी संबंधित काही तथ्ये न्यायालयात मांडली जी आक्षेपार्ह होती. निषेधही नोंदवला.

यावेळी न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाच्या वतीने उपस्थित असलेले वकील अश्विनी कुमार यांना विचारले की, सेन्सॉर बोर्ड काय करते? तो समाजाचा आरसा आहे. या चित्रपटातून येणार्‍या पिढीला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहात, मंडळाला आपली जबाबदारी समजून घेता येत नाही का?

Adipurush Controversy
Kerala Crime: ३३ वर्षापूर्वी खून, covid मुळे मृत्यूचा संशय, मग मुंबईत गेल्याची टीप; २७ वर्षापासून चकवा देणारी महिला अखेर जाळ्यात अडकलीच

या दिवशी पुन्हा सुनावणी

केवळ रामायणच नाही तर कुराण, गुरू ग्रंथ साहिब आणि गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांना तरी वाचवा, असेही न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे. आता या प्रकरणावर 27 जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

आदिपुरुषच्या अनेक संवादांवर प्रेक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. चित्रपटाला होणारा वाढता विरोध पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचे संवाद बदलले आहेत. मात्र, यातूनही काही फायदा होताना दिसत नाही.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आतापर्यंत केवळ 277 कोटींची कमाई करू शकला आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय सैफ अली खान, क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com