रेल्वेचा आणखी एक भीषण अपघात टळला; कर्नाटकमध्ये मुलाने रेल्वे रुळावर ठेवले मोठे दगड, पाहा व्हिडिओ...

यामध्ये एक अल्पवयीन मुलगा रेल्वे ट्रॅक वरती दगड ठेवताना दिसून येत आहे.
Karnataka
Karnataka Dainik Gomantak
Published on
Updated on

ओडिशा येथे नुकत्याच झालेल्या कोझिकोड एक्सप्रेसच्या भीषण अपघातात 275 लोक ठार झाले, तर बाराशे हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताला चार दिवसही उलटले नसताना कर्नाटकातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक अल्पवयीन मुलगा रेल्वे ट्रॅक वरती दगड ठेवताना दिसून येत आहे. याचा व्हिडिओ सध्या वरती ट्विटर वरती तुफान वायरल होत आहे.

अरुण पदूर नावाच्या एका ट्विटर युजरने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलगा रेल्वे ट्रॅक वरती मोठे दगड ठेवताना दिसून येत आहे. दरम्यान दोन सतर्क नागरिकांनी या मुलाला रंगेहात पकडल्यानंतर मुलाने अशी चूक तो पहिल्यांदाच करत असल्याची कबुली दिली व त्यानंतर असे करणार नाही असेही आश्वासन दिले, त्यानंतर त्यांनी मुलाला ट्रॅक वर ठेवलेले दगड हटवण्यास सांगितले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा अजून एक अपघात टळलेला आहे.

रेल्वेरूळांवर दगड ठेवल्याने रेल्वेचे चाक त्यावरून घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता असते. लहान मुलांकडून अशा पद्धतीचे काम अनावधानाने होत आहे की, त्यांच्याकडून कुणी असे काम करवून घेत आहे, याचा तपास व्हायला हवा, अशी विनंती अरुण पदूर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत केली आहे.

Karnataka
Mukhtar Ansari: …म्हणून 32 वर्षे जुन्या खटल्यात मुख्तार अन्सारीला जन्मठेप; 10 मुद्यांमध्ये समजून घ्या संपूर्ण प्रकरण

दरम्यान, बालासोरमधील तिहेरी रेल्वे अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांना शोधण्यात मदत करण्यासाठी, रेल्वेने, ओडिशा सरकारच्या समन्वयाने, निधन झालेल्या लोकांचे फोटो आणि प्रवाशांच्या याद्यांसह तीन ऑनलाइन लिंक्स तयार केल्या आहेत.

तसेच, ज्या नातेवाईकांचा ठावठिकाणा माहीत नाही त्यांच्या कुटुंबीयांसाठी भारतीय रेल्वेने ओडिशा सरकारच्या मदतीने त्यांना शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Karnataka
Foreigners Died Suspiciously In Goa: देअर लास्ट ट्रीप! गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 1

"या दुर्दैवी अपघातात बाधित झालेल्या प्रवाशांचे मित्र आणि हितचिंतक मृतांचे फोटो, विविध रुग्णालयात दाखल झालेल्या प्रवाशांची यादी आणि अनोळखी मृतदेहांची लिंक वापरून शोधू शकतात," असे रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय, या रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्या प्रवाशांचे कुटुंब आणि नातेवाईक यांना जोडण्यासाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर चोविस तास कार्यरत केली आहे. तसेच भुवनेश्वर महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक 18003450061/1929 सेवा 24 तास उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com