Delhi Excise Scam: गोवा निवडणुकीत 45 कोटींचा वापर; ईडीच्या दाव्याला आता CBI, IT ची पुष्टी

Delhi Excise Scam: सीबीआय आणि आयकर विभागाने त्यांच्या स्वतंत्र तपासात या रकमेची 'पुष्टी' केल्याचे न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे.
Delhi Liquor Scam
Delhi Liquor ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Excise Scam

दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यातील (Delhi Excise Scam) 45 कोटी रुपये गोवा निवडणुकीत वापरल्याची पुष्टी झाली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, 2022 च्या गोवा निवडणूक प्रचारात 45 कोटी रुपयांचा वापर केल्याच्या ईडीच्या दाव्याला सीबीआय आणि आयटी तपासातही पुष्टी मिळाली आहे.

सीबीआय आणि आयकर विभागाने त्यांच्या स्वतंत्र तपासात या रकमेची 'पुष्टी' केल्याचे न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे.

ईडी या प्रकरणात हवाला ऑपरेटरच्या नेटवर्कची चौकशी करत आहे. या कथित लाच प्रकरणातील मनी ट्रेल सिद्ध करण्यासाठी ईडीने 'अंगडिया' फर्मच्या पाच संचालकांचे जबाबही नोंदवले आहेत. 'अंगडिया' ही हवाला सारख्या कुरियर आणि बँक सेवा आहेत.

'अंगडिया' नेटवर्कचा वापर विशेषतः हिरे आणि दागिने व्यापारी पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आणि सरकारी कर टाळण्यासाठी करतात.

कथित दारू घोटाळ्यातून मिळालेले 45 कोटी रुपये आम आदमी पक्षाने गोवा निवडणूक प्रचारात खर्च केल्याचा ईडीचा दावा आहे. ही रक्कम राजकारणी आणि मद्य व्यावसायिकांच्या 'दक्षिण ग्रुप'ने आम आदमी पार्टीला कथितपणे दिलेल्या एकूण 100 कोटी रुपयांच्या लाचेचा भाग असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

Delhi Liquor Scam
Goa Weather Forecast: उकाड्यापासून दिलासा मिळणार, गोव्यात आठवड्याच्या शेवटी पावसाची शक्यता

ईडीने विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMAL) न्यायालयात सामायिक केलेल्या तपास तपशीलांनुसार, आम आदमी पक्षाने 2021-22 दरम्यान गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी रथ प्रॉडक्शन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीकडून सेवा आणि सुविधा घेतल्या होत्या.

सुमारे ४५ कोटी रुपयांच्या या हवाला डीलचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. सीबीआयनेही ईडीच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

सीबीआयने 8/7/2023 रोजी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात या प्रकरणाचा योग्य उल्लेख केलाय, असे ईडीने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com