Udayanidhi Stalin: सनातनबाबत वक्तव्य करणाऱ्या उदयनिधींना कोर्टानं बजावलं समन्स

Udayanidhi Stalin: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Udhayanidhi Stalin
Udhayanidhi StalinDainik Gomantak

Udayanidhi Stalin: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बंगळुरु न्यायालयाने उदयनिधी यांना समन्स बजावले आहे. बंगळुरु येथील स्थानिक रहिवासी परमेश यांच्या तक्रारीवरुन न्यायालयाने स्टॅलिन यांना समन्स बजावले आहे. 4 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायालयाने उदयनिधी यांना स्वतः हजर राहण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी उदयनिधी यांनी सनातनला संपवण्याची भाषा केली होती.

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते परमेश यांच्या वतीने वकील धरमपाल हजर झाले होते. आपल्या युक्तीवादात धरमपाल म्हणाले की, "तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला विरोध करणाऱ्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यांचे हे वक्तव्य सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि त्यांनी न्यायालयातही याचा सामना करणार असल्याचे म्हटले आहे."

Udhayanidhi Stalin
Udayanidhi Stalin: "राहुल गांधी उत्तर भारताचे तर उदयनिधी स्टॅलिन दक्षिण भारताचे पप्पू", भाजप नेत्याची टीका

ते पुढे म्हणाले की, ''राम मंदिराच्या उद्घाटनाने हिंदू धर्माबद्दलची भक्ती आणि जागरुकता वाढली आहे. त्यामुळे अशा वक्तव्यांमुळे हिंदू धर्माचे पालन करणाऱ्यांच्या आणि इतर काही धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातात.'' परमेश यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे बंगळुरु न्यायालयाने समन्स बजावले आणि उदयनिधी यांना 4 मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले.

Udhayanidhi Stalin
Chennai Floods: AI च्या जादूने चेन्नईच्या पुरात प्रकटला मुख्यमंत्री MK Stalin यांचा चेहरा

दरम्यान, गेल्या वर्षी एका कार्यक्रमात हजेरी लावताना उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. उदयनिधींच्या या वक्तव्यावरुन पीएम मोदींनी राज्य निवडणुकीदरम्यान काँग्रेसवरही निशाणा साधला होता. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. उदयनिधी म्हणाले होते की, ''काही गोष्टींना नुसता विरोध करुन चालणार नाही तर ते मुळापासून नष्ट केले पाहिजे. जसे आपण डेंग्यू, मलेरियाचे समूळ उच्चाटन करतो, तसेच सनातन धर्माचेही उच्चाटन केले पाहिजे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com