Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Muhammad Waseem T20 Record: मोहम्मद वसीमने एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
Muhammad Waseem T20 Record
Muhammad WaseemDainik Gomantak
Published on
Updated on

Muhammad Waseem T20 Record: आशिया कप 2025 मध्ये यूएई आणि ओमान यांच्यात रोमांचक सामना खेळला जात आहे. याचदरम्यान यूएईचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद वसीमने एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. या कामगिरीसह त्याने इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलरचा विक्रमही मोडला. विशेष म्हणजे, या विक्रमासह वसीमने क्रिकेट जगतात आपली एक वेगळी ओळखही निर्माण केली. बटलरसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूला मागे टाकणे ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे.

सर्वात जलद 3000 धावा

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूंच्या संख्येनुसार सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विक्रम आता मोहम्मद वसीमच्या नावावर आहे. त्याने हा विश्वविक्रम केवळ 1947 चेंडूंत केला. यापूर्वी, हा विक्रम इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या नावावर होता.

Muhammad Waseem T20 Record
Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर मात करूनही Team Indiaचं नुकसान, पॉइंट्स टेबलमध्ये झाली घसरण

या यादीतील खेळाडू:

  • 1947 चेंडू: मुहम्मद वसीम

  • 2068 चेंडू: जोस बटलर

  • 2077 चेंडू: ॲरॉन फिंच

  • 2113 चेंडू: डेव्हिड वॉर्नर

  • 2149 चेंडू: रोहित शर्मा

या आकडेवारीवरुन स्पष्ट होते की, वसीमने बटलर आणि इतर दिग्गज फलंदाजांपेक्षा खूप कमी चेंडूंत 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला.

असोसिएट देशातील दुसरा खेळाडू

वसीमचा हा विक्रम आणखी एका कारणाने खास आहे. तो असोसिएट देशांमधून (Associate Nations) 3000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा केवळ दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी, मलेशियाचा विरनदीप सिंग हा पहिला खेळाडू होता, ज्याने हा टप्पा गाठला होता.

Muhammad Waseem T20 Record
Asia Cup 2025: पाकिस्तानविरूध्दच्या सामन्याआधीच टीम इंडियाला तगडा झटका, 'या' स्टार खेळाडूनं सोडली साथ, कारण काय?

सामन्याची स्थिती

यूएई आणि ओमान यांच्यातील या सामन्यात यूएईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 172 धावा केल्या. ओमानसमोर त्यांनी 173 धावांचे लक्ष्य ठेवले. यूएईसाठी मोहम्मद वसीमने सर्वाधिक 54 चेंडूंत 69 धावांची शानदार खेळी खेळली. त्याला अलीशान शराफूने 38 चेंडूंत 51 धावा करुन मोलाची साथ दिली. त्यांच्याव्यतिरिक्त, मोहम्मद जोहैबने 21 आणि हर्षित कौशिकने 19 धावांचे योगदान दिले. तर दुसरीकडे, ओमानकडून जितेन रामानंदीने सर्वाधिक 2 बळी घेतले. आशिया कप 2025 मध्ये यूएई आणि ओमान दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना खेळला असून त्यांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com