
Asia Cup 2025 India Pakistan points table
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवार, १४ सप्टेंबर रोजी टी-२० आशिया कप २०२५ च्या ग्रुप-अ मधील सहाव्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी झाला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला, तर पाकिस्तानला पहिला पराभव स्वीकारावा लागला.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी निवडली. मात्र, सुरुवातीपासूनच त्यांना धक्के बसले. फक्त ६ धावांवर २ विकेट गमावल्याने संघ अडचणीत सापडला. साहिबजादा फरहानने ४० धावांची खेळी केली, तर शाहीन आफ्रिदीने ३३ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण संघ २० षटकांत ९ विकेट गमावून फक्त १२७ धावा उभारू शकला.
भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी गोलंदाजी करत ३ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
१२८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजीने सुरू केला. त्याने फक्त १३ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. तिलक वर्मानेही ३१ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ४७ धावांची खेळी साकारली. अखेर भारताने २५ चेंडू राखून ३ विकेट्स गमावून सामना जिंकला.
विजयानंतरही भारताचा नेट रन रेट घसरला. यूएईविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे भारताचा NRR १०.४८३ वर गेला होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध १५.५ षटकांत लक्ष्य गाठल्याने NRR ४.७९३ वर आला. परिणामी, टीम इंडिया अव्वल स्थानावर कायम असली तरी नेट रन रेटमध्ये घसरण झाली.
भारत: २ सामने – २ विजय – ४ गुण – NRR ४.७९३
पाकिस्तान: २ सामने – १ विजय, १ पराभव – २ गुण – NRR १.६४९
ओमान: १ सामना – ० गुण
यूएई: १ सामना – ० गुण
अफगाणिस्तान: १ सामना – १ विजय – २ गुण – NRR ४.७००
श्रीलंका: १ सामना – १ विजय – २ गुण – NRR २.५९५
बांगलादेश: २ सामने – १ विजय – २ गुण
हाँगकाँग: २ सामने – २ पराभव – ० गुण
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.