Punjab Politics: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मंत्री साधू सिंह धरमसोत यांना अटक

Sadhu Singh Dharamsot: काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले साधू सिंह धरमसोत यांना विजिलन्स ब्यूरोने अटक केली आहे.
Sadhu Singh Dharamsot
Sadhu Singh DharamsotTwitter/ @ANI
Published on
Updated on

Punjab Former Congress Minister Sadhu Singh Dharamsot: काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले साधू सिंह धरमसोत यांना विजिलन्स ब्यूरोने अटक केली आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी साधू सिंग सोत यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यातही त्यांना अटक करण्यात आली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना धरमसोत यांच्यावर शिष्यवृत्ती घोटाळ्याचे आरोप झाले होते.

झाडे तोडल्याप्रकरणी लाच घेतल्याचा आरोप

साधू सिंग धरमसोत यांच्यावर दक्षता पथकाने ही कारवाई केली आहे. 2022 मध्ये त्यांच्यावर वनमंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप झाला होता. त्यानुसार त्यांनी झाडे (Trees) तोडण्याच्या प्रकरणात लाच घेतली होती. साधू सिंह धरमसोत यांच्या कार्यकाळात एकूण 25000 झाडे तोडण्यात आली होती.

Sadhu Singh Dharamsot
Punjab Teacher's Training: CM भगवंत मान यांची शिक्षकांसाठी मोठी घोषणा

विशेष म्हणजे, प्रति झाड 500 रुपयांची लाच देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला कंत्राटदार आणि डीएफओ यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणात साधू सिंगचा सहभाग असल्याची माहिती मिळाली.

Sadhu Singh Dharamsot
Punjab News: भारत-पाक सीमेजवळ आढळले अमेरिकन बनावटीचे ड्रोन, 10 किलो हेरॉईन जप्त

दुसरीकडे, साधू सिंह धरमसोत यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन आम आदमी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला होता. आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) आणि शिरोमणी अकाली दलाने धरमसोत यांच्याविरोधात उग्र आंदोलन सुरु केले होते. पंजाबमध्ये आम आदमीचे सरकार स्थापन झाले, तेव्हापासून धरमसोत यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com