काश्मिरी पंडितांना चित्रपटाची नव्हे तर पुनर्वसनाची गरज आहे: केजरीवाल

भाजपचे सरकार गेली 8 वर्षे सत्तेत आहे. त्यांनी अजून काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन का केले नाही? : केजरीवाल
Arvind Kejriwal News, Arvind Kejriwal on The Kashmir files Movie
Arvind Kejriwal News, Arvind Kejriwal on The Kashmir files Movie Dainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावरून भाजपला धारेवर धरले आहे. ते म्हणाले, काश्मिरी पंडितांना चित्रपटाची नव्हे तर पुनर्वसनाची गरज आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची कमाई पंडितांच्या पुनर्वसनासाठी वापरावी असेही ते म्हणाले. (Arvind Kejriwal News)

Arvind Kejriwal News, Arvind Kejriwal on The Kashmir files Movie
VIDEO: बिहार सरकारने 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाची तिकीटे वाटली मोफत!

पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, "काश्मीरमध्ये एक मोठी शोकांतिका घडली आहे. इतक्या वर्षांनंतर सरकार काश्मिरी पंडितांना सांगते की आम्ही तुमच्यासाठी चित्रपट बनवला आहे." गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट करमुक्त केल्याबद्दल भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला होता. दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केजरीवाल म्हणाले होते, "दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना चित्रपट यूट्यूबवर (Youtube) प्रदर्शित करण्यास सांगा. चित्रपट करमुक्त करण्याची काय गरज आहे, यूट्यूबवर प्रत्येकजण तो विनामूल्य पाहू शकतो."

Arvind Kejriwal News, Arvind Kejriwal on The Kashmir files Movie
मोठा अनर्थ टळला : दिल्लीहून श्रीनगरला जाणारे स्पाइसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले

भाजपसाठी (BJP) महत्त्वाचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट करमुक्त न करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, "माझ्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा नाही. तो भाजपसाठी महत्त्वाचा असू शकतो.

पुनर्वसन का नाही?
काश्मिरी पंडितांच्या दुःखाबद्दल बोलताना ते म्हणाले, “तुम्ही कोणत्याही काश्मिरी पंडितांना विचारा, त्यांना पुनर्वसन हवे आहे. भाजपचे सरकार गेली 8 वर्षे सत्तेत आहे. त्यांनी अजून काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन का केले नाही?

'पंडितांच्या कच्च्या नोकऱ्या निश्चित केल्या'
दिल्लीचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जेव्हा काही काश्मिरी पंडित बेघर होऊन दिल्लीत (Delhi) आले, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी 1993 मध्ये दिल्ली सरकारमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नोकरी घेतली. दरम्यान, भाजप आणि काँग्रेस सरकारने राज्यात सत्तांतर केले, मात्र कच्च्या नोकऱ्या करणाऱ्यांची दखल घेतली नाही. पण आमच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने ढोल न बडवता काश्मिरी पंडितांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com