दवाखाण्यात पोहोचण्यापूर्वीच मुलाने कुशीत दम तोडला; काळीज तुटलेल्या बापाला हृदयविकाराचा झटका आला

Jammu Kashmir News: मुलाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मांडीवर दम तोडल्याने हादलेल्या बापाचा देखील हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.
Child dies before reaching hospital | Heartbroken father heart attack news
DeadbodyDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू काश्मीर: रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच १४ वर्षीय मुलाने बापाच्या मांडीवर दम तोडला. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने हादरलेल्या बापाचा देखील हृदयविकाराच्या तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. जम्मू काश्मीरच्या राम्बन जिल्ह्यात मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली.

बणीहाल भागातील तेथार येथे ही घटना घडली. शब्बीर अहमद गानिया (४५) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, साहील अहमद (१४) असे त्याच्या मृत मुलाचे नाव आहे. साहीलची तब्येत ठीक नसल्याने शब्बीर त्याला घेऊन रुग्णालयात निघाले होते. दरम्यान, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच साहीलने बाबांच्या मांडीवर जीव सोडला.

Child dies before reaching hospital | Heartbroken father heart attack news
Tribute to Ravi Naik : नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

मुलाने आपल्याच मांडीवर जीव सोडल्याचे पाहून हादलेल्या शब्बीर यांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचा देखील मृत्यू झाला. बाप – लेकांचा झालेला दुर्दैवी अंत यावरुन अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दुर्गम भागातील रुग्णालयांच्या अपुऱ्या व्यवस्थेवरुन देखील विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. बापलेकांचा मृतदेह बणीहाल येथील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com