गुजरातमधील मोडासा येथे भीषण अपघात; 6 जण जिवंत जळाले

केमिकल ट्रक आणि कार यांच्यात धडक झाल्याने लागली आग
Accident
Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

गुजरातमधील मोडासा जिल्ह्यात आलमपूर नजिक आज सकाळी मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कार यांच्यात घडला झाला आहे. या घटनेत तीन वाहनांमध्ये 6 जण अडकून जिवंत जळाले गेले. बराच वेळ वाहनांना लागलेली आग विझवता आली नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रकचा क्लिनर, दुसऱ्या ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनर आणि कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर कार चालकाने उडी मारून आपला जीव वाचवला आहे. (tragic accident at Modasa in Gujarat; 6 people were burnt alive )

घटनास्थळी उपस्थित आरटीओ कर्मचाऱ्याने याबाबत सांगितले की, चालकाने ट्रकमधून उडी मारली होती. यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, उडी मारताना तो जखमी झाला. तर त्याच्या ट्रकचा क्लिनर ट्रकमधून बाहेर पडू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी, दुसऱ्या ट्रकमध्ये दोन मृतदेह आहेत, जे चालक आणि क्लिनरचे असू शकतात.

Accident
DRIची मोठी कामगिरी, समुद्रातून 1526 कोटींचे 219 किलो अंमली पदार्थ जप्त

अपघातस्थळी असलेला ट्रक रसायनाने भरलेला होता. यामूळे आग लागण्यास मदत झाल्याचे घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी सांगितले. तसेच दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि एक कारही त्यांच्या धडकेत आली. आग इतकी वेगाने पसरली की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला होता.

Accident
नोएडाच्या भक्ताने कुत्र्याला घेऊन गाठले केदारनाथ, मंदिर समितीने दाखल केली FIR

अग्निशमन दलाने वॉटर कॅननच्या सहाय्याने ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढला

या भीषण अपघातामुळे मोडासा-नडियाद महामार्गावरील 10 किमी लांब जाम बंद झाला आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे 10 किमी लांब वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com