Traffic Rule: वाहन चालकांनी हे प्रमाणपत्र ठेवणे आवश्यक; अन्यथा थेट 5 हजाराचे चालन

चेकिंग दरम्यान वाहतूक पोलीस तुम्हाला वाहनांची कागदपत्रे विचारत असतील तर ते दाखवणे बंधनकारक आहे आणि जर ते उपस्थित नसतील तर तुम्हाला चलन देखील भरावे लागेल.
गाड्या मधून होणारे प्रदूषण
गाड्या मधून होणारे प्रदूषणDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: प्रत्येक व्यक्तीने भारतीय वाहतूक नियमांचे (traffic regulations)पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही रस्त्यावर वाहन चालवत असाल आणि तुम्ही कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले असेल तर तुम्हाला चलन भरावेच लागणार. या नियमांपैकी एक म्हणजे वाहनांची कागदपत्रे (Documents) आपल्याकडे ठेवणे जेणेकरून तुम्हाला तुमच्या वाहनाविषयी माहिती मिळेल. चेकिंग दरम्यान वाहतूक पोलीस तुम्हाला वाहनांची कागदपत्रे विचारत असतील, तर तुम्हाला ती दाखवावी लागतील आणि जर ते उपस्थित नसतील तर तुम्हालाही चलन भरावे लागेल. या कागदपत्रांपैकी एक 'प्रदूषण प्रमाणपत्र' (Pollution certificate)आहे, जे तुम्ही वाहन चालवताना ठेवले नाही तर मोठे नुकसान होणार.

गाड्या मधून होणारे प्रदूषण
Traffic Rules: सावधान वाहतूक नियम मोडाल तर...

उत्तर प्रदेशासह इतर अनेक राज्यांमध्ये वाहन चालवताना काही कागदपत्रे विसरलात, तर अनेक वेळा वाहतूक पोलीस(police) तुम्हाला किरकोळ चालान घेतल्यानंतर सोडू देतात, परंतु आता दिल्ली-NCR मध्ये, जर तुम्ही प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय गाडी चालवली तर तुमचा खिसाला कात्री लागणार. आता या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असेल.

किती असेल दंड?

दिल्ली-NCR मध्ये वाहन चालवले आणि तुम्हाला प्रदूषण प्रमाणपत्र मिळाले नाही, तर तुम्हाला नुकसानभरपाई म्हणून 5000 रुपये भरावे लागतील, किंवा तुमचे प्रदूषण प्रमाणपत्र कालबाह्य झाले असले तरी तुम्हाला तेवढाच दंड भरावा लागेल. अशा परिस्थितीत प्रत्येक वाहनचालकाला प्रदूषण प्रमाणपत्र सोबत सर्व कागदपत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com