केंद्रीय मंत्रालयातून (Union Ministry) वाहतूक नियंत्रण (Traffic Control) याविषयीचे कायदे कडक करण्याचे निर्देश राज्यांना दिले गेले आहेत. यामध्ये मोठ्या शहरांबरोबरच आता छोट्या शहरांमध्ये ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे (Violation of traffic rules) महागात पडणार आहे. करण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड (Electronic Record) केले जाणार आहे आणि त्यासंबंधीचे चलन हे पंधरा दिवसांत संबंधित वाहन मालकाला पाठवले जाणार आहे. (Traffic Rules)
राज्यांतील वाहतूक नियंत्रण संस्था महामार्ग आणि रस्ते परिवहन मंत्रालयाच्या केंद्रीय मोटर वाहन नियम मध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत याद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालकास ई-चलन पाठवले जाणार आहे, तसेच राज्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे स्पीड डिटेक्शन कॅमेरे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच या विषयीची माहिती लोकांना देण्यास बजावण्यात आले आहे नियमाप्रमाणे 15 दिवसांच्या आत हे इलेक्ट्रॉनिक चलन पाठविले जाणार जाणार आणि चलन भरल्यानंतरच इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड नष्ट केले जाईल असे मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
ज्या शहरांची दहा लाखांहून जास्त लोकसंख्या आहे व तिथे सर्व राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आणि महत्त्वाच्या चौकांत रस्त्यावर ही यंत्रणा उभी केली जाणार असून त्याविषयीचे माहिती फलकही स्पष्ट स्पष्टपणे लावण्यात यावेत असे केंद्रातून सांगितले गेले आहे. मोटार वाहन नियमांमध्ये केलेले बदल हे देशभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन कमी करणे व त्यांच्यामध्ये पारदर्शकता आणणे या उद्देशाने केले असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. यामध्ये जवळपास 132 शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर 132 शहरांमध्ये क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरा स्पीडगन स्पीड कॅमेरा कॅमेरा बॉडी कॅमेरा नंबर प्लेट नेशन वेटिंग मशीन आदी उपकरणे लावण्यात येणार आहेत अशा प्रकारची सुविधा काही शहरांमध्ये आधीपासूनच सुरू असून त्याद्वारे ही चलन सिस्टीम सुरू आहे तिथेही ही उपकरणे वाढवण्यात येणार आहेत यामुळे चलनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.