TMC Candidate List 2024: काँग्रेसला ममतांचा दे धक्का! क्रिकेटर युसूफ पठाणला TMC कडून लोकसभेचं तिकीट; 42 उमेदवारांची यादी जाहीर

Mamata Banerjee Trinamool Congress Candidates: ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
Yusuf Pathan
Yusuf Pathan DainilK Gomantak

Mamata Banerjee Trinamool Congress Candidates: ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आज, कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर तृणमूल काँग्रेस (TMC) ची रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांची नावे एक एक करुन सांगितली.

दरम्यान, अर्जुन सिंह यांचे बराकपूरमधून तिकीट कापण्यात आले आहे. तर भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि महुआ मोईत्रा यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महुआ मोइत्रा यांना दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. टीएमसीचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे देखील रॅलीत दिसले.

कोलकाता येथील मेगा रॅलीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कोणताही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी राज्यातील सर्व 42 जागांवर आपले उमेदवार उभे केले.

या यादीत कूचबिहारमधून जगदीश चंद्र बसुनिया, अलीपुरद्वारमधून प्रकाश चिक बराक, जलपाईगुडीमधून निर्मल चंद्र राय, दार्जिलिंगमधून गोपाला लामा, रायगंजमधून कृष्णा कल्याणी, मालदा उत्तरमधून प्रसून बॅनर्जी, मालदा दक्षिणमधून शाहनवाज अली रेहमान यांना तिकिटे देण्यात आली आहेत. जंगीपूर येथून खलीलूररहमान यांना तिकीट देण्यात आले.

Yusuf Pathan
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला तिकीट

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील सभेत त्याच्या नावाची घोषणा केली. टीएमसीने त्याला बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे. या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे खासदार आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध क्रिकेटपटूला मैदानात उतरवून ममता बॅनर्जींनी मोठी खेळी खेळली आहे.

Yusuf Pathan
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवरील व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या प्राध्यापकाची तब्बल 11 वर्षानंतर सुटका

दुसऱ्या माजी क्रिकेटपटूला तिकीट

ममता बॅनर्जी यांनी माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनाही बर्दवानमधील दुर्गापूरमधून तिकीट दिले आहे. टीएमसीच्या या यादीत लोकसभेचे तिकीट मिळालेल्या आमदारांचाही समावेश आहे, ज्यामध्ये जलपाईगुडीतून निर्मल चंद्र राय, राणाघाटातून मुकुटमणी अधिकारी, मिदनापूरमधून जून मलिया, बांकुरा येथून अरुप चक्रवर्ती यांना तिकीट देण्यात आले आहे. युथ टीएमसीच्या अध्यक्षा सयोनी घोष यांना जाधवपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.

दुसरीकडे, या यादीत ममता बॅनर्जी यांनी 32 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. अशा स्थितीत ममता बॅनर्जींनी आपल्या उमेदवारांमध्ये मोठा फेरबदल केला आहे, असे म्हणता येईल. चित्रपट अभिनेत्री रचना बॅनर्जी यांना हुगळीतून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय, माजी आयपीएस अधिकारी प्रसून बॅनर्जी मालदा उत्तरमधून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी नुसरत जहाँचे तिकीटही कापण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com