Rahul Shivshankar Resigns: टाईम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर यांनी दिला राजीनामा!

Times Now: टाइम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असे न्यूजलॉंड्रीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
Times Now Chief Editor Rahul Shivshankar Quits Channel
Times Now Chief Editor Rahul Shivshankar Quits ChannelDainik Gomantak
Published on
Updated on

Times Now Chief Editor Rahul Shivshankar Quits Channel: टाइम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असे न्यूजलॉंड्रीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

राहुल यांनी त्यांच्या ट्विटरवरील अपडेटेड बायोमध्ये 'एडिटर-इन-चीफ टाइम्स नाऊ, 2016 ते 2023, असे लिहिले आहे. ते एक "प्रोग्रेसिव्ह कंझर्व्हेटिव्ह जर्नालिस्ट" असल्याचे त्यांच्या बायोमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, चॅनेलच्या मानव संसाधन विभागाने सांगितले की, “टाईम्स नाऊचे मुख्य संपादक राहुल शिवशंकर यांनी नेटवर्कपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाहता, चॅनलचे कामकाज तात्काळ प्रभावाने नाविका कुमार यांच्याकडे असेल. टाइम्स नाऊ टीमचे सर्व ऑपरेटिंग कंटेंट मॅनेजर नाविकाला रिपोर्ट करतील."

Times Now Chief Editor Rahul Shivshankar Quits Channel
Kerala High Court: "याचा अर्थ असा नाही की, आई मुलांसाठीही वाईट असते..." न्यायाधीशांचे दोनच शब्द अन् कोर्ट रुम स्तब्ध

दुसरीकडे, NewsX च्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा शिवशंकर यांनी दिला. 2016 मध्ये शिवशंकर चॅनेलशी जोडले गेले होते.

टाइम्स नाऊ वरील प्राइमटाइम 8 PM शो होस्ट करणारे ते एक प्रमुख अॅंकर होते. वृत्त उद्योगातील दोन दशकांहून अधिक अनुभवासह, त्यांनी हेडलाइन टुडे आणि इंडिया टुडे सोबतही काम केले आहे.

राहुल शिवशंकर आणि नाविका कुमार यांच्यात स्पर्धा

नाविका कुमार आणि राहुल शिवशंकर यांच्यातील स्पर्धा टाइम्स नाऊच्या न्यूजरुममध्ये कोणापासूनही लपून राहिलेली नव्हती.

मात्र, नाविकाने टाइम्स नवभारत या हिंदी चॅनलवर आपले लक्ष केंद्रित केल्यामुळे राहुल यांना तात्पुरता दिलासा मिळाला होता.

तथापि, नाविकाने अंतिम अधिकार आपल्याकडे कायम ठेवले होते. राहुल यांच्या राजीनाम्यामागील कारण एक गूढच आहे, परंतु या प्रकरणावर प्रकाश टाकून अतिरिक्त अपडेट येत्या काही दिवसांत समोर येऊ शकते.

Times Now Chief Editor Rahul Shivshankar Quits Channel
Kerala High Court: 'बार कौन्सिलचे सदस्य एलएलबीचा अभ्यासक्रम ठरवतात, ही सर्वात मोठी शोकांतिका...', केरळ HC च्या न्यायाधीशांचं वक्तव्य

वादविवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

शिवशंकर यांच्या कार्यक्रमातील वादविवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, जेव्हा रशिया-युक्रेन (Ukraine) युद्धावरील डिबेटच्या वेळी ते एका चुकीच्या व्यक्तीवर ओरडत होते. शिवशंकर हे युक्रेनवर सुरु असलेल्या रशियन आक्रमणावर चर्चा करत होते.

त्यांच्या पॅनलमध्ये रॉन पॉल इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॅनियल मॅकअॅडम्स आणि कीव पोस्टचे मुख्य संपादक बोहदान नहायलो यांचा समावेश होता. शो दरम्यान एका क्षणी, शिवशंकर यांनी "डॅनियल मॅकअॅडम्स" ला थोडे थंड घेण्यास सांगितले होते.

शिवशंकर यांच्या जाण्याने प्रश्न निर्माण झाले आहेत

राहुल शिवशंकर यांची टाइम्स नाऊमधून बाहेर पडल्याची बातमी येताच सोशल मीडिया वेबसाइट्सवर अटकळी बांधण्यास सुरुवात झाली.

पत्रकार रोहिणी सिंगने आपल्या ट्विटमध्ये दावा केला की "नोएडास्थित चॅनेलद्वारे मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत". शिवशंकर यांना बडतर्फ केल्याचे संकेतही तिने दिले.

मात्र, शिवशंकर यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला की चॅनलने त्यांना बडतर्फ केले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

काही दिवसांपूर्वी, आणखी एक लोकप्रिय प्राइम टाइम अँकर रुबिका लियाकतनेही एबीपी न्यूजला अलविदा केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com