Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Student Viral Video: अचानक पाणी अंगावर पडताच तिघेही विद्यार्थी गडबडीने तिथून पळू लागले. मुलगा त्याची स्कुटी घेऊन लगेच पळून जातो.
Viral Video
Viral Video
Published on
Updated on

School Bunking Video: शाळेतून पळून जाऊन शॉपिंग मॉलमध्ये फिरणे, मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे किंवा कॅन्टीनमध्ये बसणे अशा विद्यार्थ्यांच्या कहाण्या तुम्ही अनेकदा ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ Gen-Z (झेन-झेड) विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीला एक नवीन आणि अधिक 'मॉडर्न' वळण देणारा आहे. शाळेला दांडी मारुन सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर (Student) संतप्त नागरिकांनी बादलीभर पाणी ओतून त्यांना पळवून लावले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Viral Video
Viral Video: 15 बायका, 30 मुलं आणि 100 सेवक! राजा 'मस्वाती' शाही लवाजम्यासह अबू धाबी विमानतळावर दाखल; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

व्हिडिओमध्ये नेमके काय?

दरम्यान, @Amrita_2121 नावाच्या एक्स हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तीन शालेय विद्यार्थी (एक मुलगा आणि दोन मुली) एका गल्लीमध्ये उभे राहून अयोग्य वर्तन करताना दिसत आहेत.

  • या व्हिडिओमध्ये मुलगा कधी दोन मुलींसोबत गळाभेट घेताना दिसतो, तर कधी एका मुलीला कवेत घेऊन गोल फिरवताना दिसतो.

  • एका ठिकाणी तर तो एका मुलीला चुंबन (Kiss) घेतानाही स्पष्टपणे दिसत आहे.

  • त्यांच्या या सर्व कृत्यांकडे बाल्कनीमध्ये उभे असलेले लोक पाहतात आणि सुरुवातीला हसतात.

मात्र, त्यांचे हे वर्तन अश्लीलतेची मर्यादा ओलांडत असल्याचे पाहून बाल्कनीतील त्यांच्यापैकी एका व्यक्तीने बादलीमध्ये पाणी भरुन आणले आणि तिघांवरही ओतले.

Viral Video
Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

पाणी पडताच विद्यार्थी पळाले

अचानक पाणी अंगावर पडताच तिघेही विद्यार्थी गडबडीने तिथून पळू लागले. मुलगा त्याची स्कुटी घेऊन लगेच पळून गेला. यावेळी वरुन व्हिडिओ बनवणारे लोक ओरडताना ऐकू येतात. "ओए! काय करत आहेस, लाज वाटत नाही? खाली येऊ का?'' या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेला संदेशही खूप आक्रमक आहे. "अशी (गैर) कृत्ये करताना जो कोणी दिसेल, त्यांच्यावर पाणी फेकू नका, तर वीट आणि दगड फेका, जेणेकरुन भविष्यात सार्वजनिक ठिकाणी ते असे करणार नाहीत."

Viral Video
Viral Post: 'तेरा नाम लिया तुझे याद किया...' रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेतली, वसीम जाफरने शेअर केला गाण्याचा VIDEO

यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया (Social Media) यूजर्संनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत:

  • एका युजरने लिहिले, "बिल्कुल बरोबर, अशा लोकांवर दगडच फेकायला हवेत."

  • दुसऱ्याने लिहिले, "मुलगा आणि मुलगी दोघांनाही काठी द्यायला हवा होता, पाणी फेकण्याने काही होत नाही."

  • अनेकांनी 'अशा सडकछाप आशिकांनीच समाजात आणि देशात घाण पसरवली आहे,' अशा शब्दांत विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा निषेध केला.

अनेक लोकांनी शालेय गणवेशात अशा प्रकारची अयोग्य कृत्ये करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करुन त्यांना पालक आणि पोलिसांसमोर एक्सपोज करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com