आंध्र प्रदेशातील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 3 भाविक जखमी

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली या दरम्यान किमान तीन जण जखमी झाले.
Tirupati
TirupatiDainik Gomantak
Published on
Updated on

तिरुपती: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली या दरम्यान किमान तीन जण जखमी झाले. तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराच्या तिकीट काउंटरवर सर्वदर्शन तिकीट काढण्यासाठी यात्रेकरूंची मोठी गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Three people were injured in stampede like situation at tirumala shrine in Tirupati)

Tirupati
Congress News: सेवादलाचे दिल्लीतील कार्यालय काँग्रेस करणार रिकामे, आदेश जारी

तिरुमाला तिरुपती देवस्थान (TTD) पीआरओ रवी कुमार यांनी सांगितले की, तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरातील 3 टोकन काउंटरवर प्रचंड गर्दी होती. मात्र, ही गर्दी पाहता यात्रेकरूंना थेट दर्शनासाठी जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता परिस्थिती सामान्य झाली आहे.

व्यंकटेश्वर मंदिरातील सर्वदर्शन तिकीट सुविधेद्वारे सर्वांना मोफत दर्शन मिळते. मात्र, दर्शनासाठी नंबर यायला बराच वेळ लागतो. मोफत सुविधेमुळे येथे अनेकदा मोठी रांग लागते. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी सर्वदर्शनाची वेळ बदलते. इतर मंदिरांतील दर्शनाच्या पद्धतींपेक्षा या मंदिरामध्ये भाविकांची संख्या जास्त असते.

कोरोना महामारीमुळे तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर गेल्या दोन वर्षांपासून भाविकांसाठी बंद होते. यावर्षी 14 मार्च रोजी तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात भाविकांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिरुमाला वेंकटेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. समुद्रसपाटीपासून 3200 फूट उंचीवर तिरुमला टेकडीवर बांधलेले वेंकटेश्वर मंदिर हे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य आणि कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com