मध्य प्रदेशात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या माय - लेकाच्या जोडीने देश विघातक कृत्य केले असून अंडरवर्ल्डच्या लोकांना पुरवठा करण्याच्या उद्देशाने राहत्या घरालगतच ( पत्र्याचे शेड ) 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या दोन्ही आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
(A mother and her son from Madhya Pradesh district Manegaon have been sentenced to six years on the charge of printing fake money)
मिळालेल्या माहितीनुसार आई मंजु आणि मुलगा सुरज (रा. मध्य प्रदेश जिल्हा मानेगांव मुळ गाव समजू शकलेले नाही ) यांनी राहत्या घरालगत असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये हा कारभार केला आहे. या दोघांना पोलिसांनी नकली नोटा तयार करत त्या अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना विकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मंजु आणि सुरज आपल्या घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापत ते कोर्टाच्या सुनावणीत कशाप्रकारे दोघे नकली नोटा छापत होते हे सांगितलं आहे. यानंतर नॅशनल काउंटरफिट करन्सी एजन्सीने नोटा चलनात आल्यावर चौकशी करत नंतर याबाबत खुलासा केला. या सुनावणीदरम्यान न्यायालायाने मंजुला साडे सहा वर्षांची शिक्षा सुनावली, तर मुलाला 2 वर्ष बाल कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.