महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ! उत्तर प्रदेश आघाडीवर: NCW रिपोर्ट

राष्ट्रीय महिला आयोगाला (NCW) गेल्या वर्षी महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या सुमारे 31,000 तक्रारी प्राप्त झाल्या. जो 2014 नंतरचा सर्वाधिक उच्चांक आहे.
Women

Women

Dainik Gomantak 

राष्ट्रीय महिला आयोगाला (NCW) गेल्या वर्षी महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या सुमारे 31,000 तक्रारी प्राप्त झाल्या. जो 2014 नंतरचा सर्वाधिक उच्चांक आहे. यातील निम्म्याहून अधिक प्रकरणे एकट्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आहेत. त्याचवेळी 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये महिलांवरील (Women) गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यादरम्यान 23,722 तक्रारी प्राप्त झाल्या.

खरंतर, अधिकृत NCW डेटानुसार, 30,864 तक्रारींपैकी बहुतेक 11,013 तक्रारी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराशी संबंधित होत्या. त्यापाठोपाठ कौटुंबिक हिंसाचाराच्या 6,633 तक्रारी आणि हुंडाबळीच्या छळाच्या 4,589 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या कालावधीत, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यूपीमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या सर्वाधिक 15,828 तक्रारी नोंदल्या गेल्या. यानंतर दिल्लीत (Delhi) 3,336, महाराष्ट्रात (Maharashtra) 1,504, हरियाणामध्ये 1,460 आणि बिहारमध्ये (Bihar) 1,456 तक्रारी नोंदवण्यात आल्या.

<div class="paragraphs"><p>Women</p></div>
त्रासाला कंटाळून समलिंगी शिक्षकाने उचलले धडकी भरवणारे पाऊल

गेल्या वर्षी 2014 पासून एनसीडब्ल्यूकडे सर्वाधिक तक्रारी आल्या

सरकारी आकडेवारीनुसार, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि घरगुती हिंसाचाराशी संबंधित सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशातून प्राप्त झाल्या आहेत. त्याच वेळी, 2014 पासून NCW कडे प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या गेल्या वर्षी सर्वाधिक होती. 2014 मध्ये एकूण 33,906 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी यापूर्वीच सांगितले होते.

दरम्यान, आयोग लोकांना त्यांच्या कामाबद्दल अधिक जागरुक करत असल्यामुळे हे घडत आहे. याशिवाय आयोगाने नेहमीच महिलांच्या मदतीसाठी नवनवीन उपक्रम सुरु करण्याचे काम केले आहे, असे शर्मा यांनी म्हटले. या अनुषंगाने आम्ही गरजू महिलांना आधार सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी चोवीस तास हेल्पलाइन सुरु केली आहे.

जुलै ते सप्टेंबर 2021 पर्यंत 3,100 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या

विशेष म्हणजे, जुलै ते सप्टेंबर 2021 पर्यंत दर महिन्याला 3,100 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, शेवटच्या 3,000 हून अधिक तक्रारी नोव्हेंबर 2018 मध्ये प्राप्त झाल्या होत्या, जेव्हा भारतात 'MeToo' चळवळीचे पेव फुटले होते. त्याचप्रमाणे, NCW डेटानुसार, विनयभंग किंवा महिलांची छेडछाड या गुन्ह्यांबाबत 1,819 तक्रारी, बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्नाच्या 1,675 तक्रारी, महिलांबद्दल पोलिसांच्या उदासीनतेच्या 1,537 तक्रारी आणि सायबर गुन्ह्यांच्या 858 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

त्याच वेळी, सायबर सुरक्षेविषयी माहिती देण्याच्या दिशेने काम करणाऱ्या 'आकांक्षा श्रीवास्तव फाऊंडेशन' या ना-नफा संस्थेच्या संस्थापक आकांक्षा श्रीवास्तव म्हणाल्या की, जेव्हा तक्रारी वाढतात तेव्हा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. यामधून महिलांमध्ये जागृती वाढली असल्याचे दिसून येते. यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध आहे आणि त्यांना कुठे तक्रार करायची हे माहित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com