Top Ten Richest people: जागतिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहा नंबरात झळकले 'हे' भारतीय

फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून इलॉन मस्क यांचे नाव घोषित केले आहे.
Top Ten Richest people
Top Ten Richest peopleDainik Gomantak
Published on
Updated on

फोर्ब्सने नुकतीच अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून इलॉन मस्क यांचे नाव घोषित केले आहे. टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलोन मस्क हे दीर्घकाळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले असले तरी त्यांच्या संपत्तीतही काही प्रमाणात घट झाली आहे. अलीकडच्या काळात, इलॉन मस्क त्यांच्या ट्विटर संबंधीच्या प्रकरणामुळे सर्वाधिक चर्चेत आले. सन 2022 मध्ये, इलॉन मस्क सतत ट्रेंडमध्ये आहे आणि वर्षभर टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

जागतिक श्रीमंतांच्या संपत्तीची आकडेवारी-

1. एलोन मस्क- टेस्लाचे सह-संस्थापक आणि सीईओ एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती $191.2 अब्ज आहे. यामध्ये $39 दशलक्षची वाढ झाली आहे, जरी या वर्षी त्याच्या एकूण संपत्तीत सुमारे $200 बिलियनची घट झाली आहे, ज्यामुळे त्याच्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील व्यक्तीमध्ये संपत्तीमध्ये फारसा फरक नाही.

2. बर्नार्ड अरनॉल्ट - हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती $179.5 अब्ज आहे.

Top Ten Richest people
Pakistan Army: पाक लष्करात मोठी खळबळ, पूर्व ISI प्रमुखांनी निवृत्तीची केली मागणी

3. गौतम अदानी- गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती $133.6 अब्ज इतकी आहे. गौतम अदानी हे अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

4. जेफ बेझोस- अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती $117.3 अब्ज आहे.

5. वॉरेन बफे- वॉरेन बफे बार्कशायर हॅथवेचे सीईओ आहेत आणि जगातील शीर्ष 10 श्रीमंत लोकांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $108.5 अब्ज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com