सुपरटेकच्या ट्विन टावरचा पत्ता कट, भारतात पहिल्यांदाच पाडली जाणार 32 मजली इमारत

नोएडामध्ये स्थित असणाऱ्या सुपरटेक (Supertech) बिल्डरने बांधलेला 32 मजली ट्विन टॉवर पाडण्यासाठी उद्या ड्राय रन होणार आहे.
Twin Tower
Twin TowerDainik Gomantak
Published on
Updated on

नोएडामध्ये स्थित असणाऱ्या सुपरटेक बिल्डरने बांधलेला 32 मजली ट्विन टॉवर पाडण्यासाठी उद्या ड्राय रन होणार आहे. तत्पूर्वी पूर्ण तयारी झाली आहे. या इमारतीची उंची सुमारे 103 मीटर आहे. एवढी उंच इमारत भारतात (India) प्रथमच पाडली जाणार आहे. हे काम दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) जेट डिमॉलिशन या कंपनीच्या सहकार्याने केले जाणार आहे. वास्तविक, नोएडाच्या सेक्टर 93A मध्ये बांधलेला 32 मजली ट्विन टॉवर पाडण्याची तयारी जोरात सुरु आहे. रविवारी टॉवर पाडण्यासाठी ड्राय रन होणार असून सर्व काही सुरळीत राहिल्यास 22 मे रोजी हा टॉवर अवघ्या 9 सेकंदात जमीनदोस्त होईल. हे टॉवर सुपरटेक बिल्डरने (Supertech Builder) बेकायदेशीरपणे बांधले होते, जे सर्वोच्च न्यायालयाने पाडण्याचे आदेश दिले होते. (There will be a dry run tomorrow to demolish the 32-storey twin tower built by Supertech Builder)

मिळालेल्या माहितीनुसार, इमारत पाडण्यासाठी ड्राय रनसाठी पलवलमधून सुमारे 5 किलो स्फोटके पोलिस संरक्षणात आणली जाणार आहेत. या स्फोटकाने 13 व्या मजल्यावरील 1 कॉलम आणि बेसमेंटमधील 5 कॉलम ब्लास्ट होणार आहेत. अडीच वाजता हे स्फोट करण्यात येणार आहेत. यादरम्यान ट्विन टॉवरसमोरील रस्ता सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. एटीएस आणि एमराल्ड कोर्टच्या शेजारील सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना स्फोटाच्या आधी आणि 15 मिनिटांनंतर सोसायटीच्या बाहेर पडू नये आणि खिडक्यांच्या जवळ येण्यास मनाई केली आहे.

Twin Tower
हिमाचल प्रदेशमध्ये 'आप'ला मोठा झटका; प्रदेश अध्यक्षच 'भाजप'मध्ये सामील

दरम्यान, एडफिसचे प्रकल्प व्यवस्थापक मयूर मेहता यांनी सांगितले की, ''32 मजली इमारत पहिल्यांदाच कोसळणार आहे. भारतातील कोणत्याही एजन्सीने असे काम केलेले नाही. आमच्या भागीदार एजन्सी, जेट डिमॉलिशन ऑफ आफ्रिकेने आफ्रिकेतील 108 मीटरची इमारत पाडली आहे. इथे भारतात, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने, आम्ही कोचीमध्ये 60 मीटर उंच इमारत पाडली आहे. ही इमारत (Twin Towers) 103 मीटर उंच आहे.''

दुसरीकडे, ट्विन टॉवरला लागून असलेल्या एमराल्ड कोर्ट सोसायटीचे आरडब्ल्यूए अध्यक्ष उदयभान सिंग तेवतिया यांनी सांगितले की, ''जिथे 23 फ्लॅट्स बांधायचे होते, तिथे जवळपास 700 फ्लॅट्स बनवण्यात आले. आम्ही नोएडा अथॉरिटीला सुपरटेक बिल्डरला ते थांबवण्यास सांगितले, परंतु कोणीही मान्य न केल्यावर आम्ही न्यायालयात गेलो त्यानंतर न्यायालयाकडून ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश देण्यात आले. आमची सोसायटी ट्विन टॉवर्सपासून फक्त 9 मीटर अंतरावर आहे. लोक घाबरले आहेत. परंतु टॉवर पाडणाऱ्या एजन्सीने काहीही होणार नसल्याचे सांगितले आहे. आमच्या घरांचाही विमा उतरवला जात आहे.''

Twin Tower
पंजाबमधील दणदणीत विजयानंतर 'आप' करणार हिमाचल प्रदेशमध्ये 'एन्ट्री'

याशिवाय, 22 मे रोजी ही इमारत अवघ्या 9 सेकंदात अशा प्रकारे पाडली जाईल की, तिचा मलबा आजूबाजूला पसरणार नाही. परंतु धुळीचे वादळ आणि कंपने टाळण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. त्या दिवशी आजूबाजूची घरे रिकामी केली जातील आणि नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेही अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात येईल. ट्विन टॉवर्स तोडण्यासाठी सुमारे 18 कोटी खर्च येणार आहे. इमारतीतून सुमारे 25,000 टन मलबा बाहेर पडेल असा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com