भ्रष्टाचारात अडकलेल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या

परवाना पिस्तुलाने झाडली स्वतःवर गोळी
CRIME NEWS
CRIME NEWS Dainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबचे वरिष्ठ आयएएस अधिकारी संजय पोपली हे पंजाबमध्ये पेन्शन संचालक म्हणून नियुक्ती होते. मात्र चार दिवसांपूर्वी त्यांना लाच घेतल्याच्या आरोपात चंदीगड येथून अटक करण्यात आली होती. मलनिस्सारण ​​मंडळ सीईओ असताना त्यांनी 7.3 कोटी रुपयांच्या मलनिस्सारण ​​प्रकल्पात 1 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करण्यात आला. त्यापैकी 3.50 लाखांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. असा आरोप होता. (Punjab The son of a corrupt IAS officer committed suicide )

CRIME NEWS
सर्वोच्च न्यायालयात पदवी धारकांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

पोपली यांच्या राहत्या घरीच गोळी लागल्याने मुलगा कार्तिक पोपली (26) याचा मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे. मात्र तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या वादावादीमूळे आपल्या मूलाने हे पाऊल उचलले असल्याचा आरोप पोपली यांनी केला आहे.ही घटना घडल्याचे समजताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत होती. यानंतर चंदिगड एसएसपी कुलदीप चहल यांनी सांगितले की, कार्तिकने त्याच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली. तर कार्तिकला गोळी लागली असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

CRIME NEWS
अमित शहा म्हणाले, 'SIT समोर नरेंद्र मोदी नाटक करत गेले नव्हते...'

कार्तिक आणि दक्षता अधिकाऱ्यांमध्ये झाली वादावादी

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दक्षता पथक त्यांच्या घरी आले होते. यादरम्यान तपास करण्यात आला. काही वसुली करण्यासाठी दक्षता आली होती. यादरम्यान कार्तिक आणि दक्षता अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. वादानंतरच त्यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडली. कार्तिकच्या आईने सांगितले की, त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले.

कमिशन घेताना पोपलीला अटक

आयएएस अधिकारी संजय पोपली यांची पंजाब सरकारमध्ये पेन्शन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी दक्षता ब्युरोने त्याला चंदीगड येथून अटक केली होती. मलनिस्सारण ​​मंडळाचे सीईओ असताना त्यांनी 7.3 कोटी रुपयांच्या मलनिस्सारण ​​प्रकल्पात १ टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करण्यात आला. त्यापैकी 3.50 लाखांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी दबाव आणल्यानंतर, हरियाणाच्या कर्नालच्या कंत्राटदाराने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक हेल्पलाइनकडे तक्रार केली. त्यानंतर पोपलीला अटक करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com