'Corona Vaccination मुळेच भारतीय तरुणांचे अचानक मृत्यू होत आहेत का? ICMRच्या अभ्यासातून नवा खुलासा

Corona Vaccination: भारतातील या मृत्यूमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की, हे सर्व मृत्यू कोविड-19 संसर्ग किंवा कोविड लसीकरणाशी संबंधित आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा अभ्यास करण्यात आला.
Covid-19 vaccination And ICMR Study
Covid-19 vaccination And ICMR StudyDainik Gomantak

'The risk of sudden death among young adults in India is not increased by the Covid-19 vaccination,' the ICMR study said:

कोरोनाच्या कालावधीनंतर तरुणांच्या मृत्यूमध्ये अचानक वाढ झाली आहे. कोरोना लसीकरणामुळे लोकांचा अचानक मृत्यू होत असल्याची चर्चा सतत सुरू असते. अशात ICMR च्या अभ्यासात या संदर्भात बरेच नवे खुलासे करण्यात आले आहेत.

ICMRने अभ्यासात म्हटले आहे की, 'भारतातील तरुण प्रौढांमध्ये अचानक मृत्यू होण्याचा धोका कोविड-19 लसीकरणामुळे वाढलेला नाही.

कोरोनामुळे, दीर्घकाळ रुग्णालयात दाखल असणे, अचानक मृत्यूचा कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैलीतील बदल जसे की जास्त शारीरिक श्रम करणे व दारू आणि सिगारेटचे जास्त सेवन करणे यासारखे घटक तरुणांच्या अचानक वाढलेल्या मृत्यूंना जबाबदार असल्याचे समोर आले आहेत.

या अभ्यासात संपूर्ण देशभरातील १८ ते ४५ वयोगटातील ४७ टेरिटरी केअर रुग्णालयांतील रुग्णांचा समावेश होता, ज्यांचे 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 दरम्यान अचानक निधन झाले. त्यांच्या मृत्यूची कारणे स्पष्ट होऊ शकली नाहीत. मात्र, कोविड लसीकरणामुळे तरुणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढलेला नाही, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

अभ्यासादरम्यान, मृत्यूची 729 प्रकरणे पाहिली गेली. या सर्व लोकांचा वैद्यकीय इतिहास, धूम्रपान, अल्कोहोल आणि जास्त शारीरिक श्रम, त्यांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते का आणि त्यांचे लसीकरण करण्यात आले होते का? या सर्व घटकांचा विचार करण्यात आला.

अभ्यासात असेही म्हटले आहे की, लसीकरणामुळे भारतातील तरुण प्रौढांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढला नाही, परंतु प्रौढांमधील हा धोका कमी झाला.

Covid-19 vaccination And ICMR Study
एकदा दिलेली संमती व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण सुरू ठेवण्याचा परवाना देत नाही: हायकोर्ट

काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अभ्यासाचा हवाला देत लोकांना इशारा दिला होता की, ज्यांना कोरोनाचा गंभीर त्रास झाला आहे त्यांनी एक किंवा दोन वर्षे जास्त मेहनत करणे टाळावे.

तज्ञ असेही म्हणतात की, कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच व्यायाम करावा. आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, एकाच वेळी जास्त आणि कठोर व्यायाम करणे टाळले पाहिजे.

Covid-19 vaccination And ICMR Study
मुलांच्या आत्महत्येमागे पालकांचा दबाव, कोचिंग इन्स्टिट्यूटच्या नियमनाचे निर्देश देऊ शकत नाही: सुप्रीम कोर्ट

भारतातील तरुणांमध्ये अकस्मात मृत्यूचे प्रमाण वाढल्याने संशोधकांना हा आभ्यास करण्यास प्रेरित केले.

भारतातील या मृत्यूमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की, हे सर्व मृत्यू कोविड-19 संसर्ग किंवा कोविड लसीकरणाशी संबंधित आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा अभ्यास करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com