पत्नीवरील संशयामुळे कुटुंब उद्ध्वस्त... विष देऊन घरातील सर्वांची हत्या करणाऱ्याची शेवटी आत्महत्या

West Bengal: पोलिसांनी सांगितले की, वृंदाबनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, तर इतर तीन मृतदेह फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते.
West Bengal Crime News
West Bengal Crime NewsDainik Gomantak

The dead bodies of four members of the same family have been found in their own flat in North 24 Parganas district of West Bengal:

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह त्यांच्याच फ्लॅटमध्ये आढळून आले आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 52 वर्षीय कापड व्यावसायिक वृंदाबन कर्माकर, त्यांची पत्नी देबश्री कर्माकर त्यांची 17 वर्षांची मुलगी देबलीना आणि 8 वर्षांचा मुलगा उत्साहा अशी मृतांची नावे आहेत.

बराकपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत खर्डा भागातील एमएस मुखर्जी रोडवरील एका बंद अपार्टमेंटमध्ये हे मृतदेह सापडले आहेत.

वृंदाबन कर्माकर यांनी प्रथम कुटुंबीयांना विष पाजून मारले आणि नंतर आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, वृंदाबनचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, तर इतर तीन मृतदेह फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते.

West Bengal Crime News
Kapil Dev: "बिशन सिंग बेदींप्रमाणेच..." कपिल देव यांना फायनलला न बोलावल्याने जयराम रमेश संतापले

पोलिसांनी सांगितले की, पीडित कुटुंबियांच्या फ्लॅटमधून एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात वृंदाबन कर्माकर यांनी पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला आहे. हा प्रकार सहन होत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

West Bengal Crime News
Prayagraj-Goa Flight: प्रयागराज ते गोवा थेट विमानसेवा सुरू होणार? विमान कंपन्या करणार सर्व्हे

अपार्टमेंटमधून दुर्गंधी आल्याने स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. फ्लॅटचा मुख्य दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा लागला आणि मग पोलिसांनी आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com