New Parliament Inauguration: नव्या संसदेतून घडेल नवा भारत

ऐतिहासिक सोहळा : पंतप्रधान मोदी यांची ग्वाही; नव्या वास्तूचे दिमाखात उद्‍घाटन
Narendra Modi
Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

New Parliament Inauguration: गेल्या अनेक दिवसांपासून अवघा देश ज्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात होता, अखेर तो क्षण आज आला. वेद मंत्रांच्या उच्चारात विविध धर्मगुरूंच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देशाला नवी संसद मिळाली.

नवे लक्ष्य, नवे रस्ते, नवे विचार, नवी दृष्टी व नवा विश्वास मनात घेऊन विकसित व श्रेष्ठ भारताची निर्मिती करण्यासाठी नवे संसदभवन ऊर्जास्रोत ठरेल. नव्या संसदेतून नवा भारत घडेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांच्या हस्तेच आज नव्या वास्तूचे एका शानदार सोहळ्यात उद्‍घाटन झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनाची गरज, भविष्यातील भारताची वाटचाल व समृद्ध वारसा जपण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. जवळपास 40 मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले की, हा ऐतिहासिक दिवस आहे.

हा दिवस लोकशाहीला मिळालेली एक भेट आहे. त्यांची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने होईल. देशातील 140 कोटी जनतेच्या स्वप्नांचे प्रतिबिंब या संसदभवनातून पाहायला मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केले. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या संदेशाचे वाचन केले.

यानंतर संसदेचे नवनिर्मित भवन व सेंगोल या दोन लघुचित्रफिती दाखविण्यात आल्या. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त डाक तिकीट आणि 75 रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

Narendra Modi
Rainy Season In Goa: मच्छीमार, ट्रॉलर्समालकांची जेटींवर आवराआवर

भूमिपूजनावेळी वापरली गोव्याची माती : डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘ट्विट’द्वारे सांगितले की, पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसदेच्या उदघाटन सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याचा आणि गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मला मिळाला.

संसद इमारतीच्या भूमिपूजनावेळी गोव्यातील माती पाठवण्यात आली होती. संसदेची नवी इमारत भारतातील सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व करते. नवीन संसदेत भारताचे सार प्रतिबिंबित झाले आहे.

Narendra Modi
Calangute to Baga Street Light Issue: बागा ते कळंगुट पथदिव्यांची बत्ती गुल, एक वर्षापासून GTDC चे दुर्लेक्ष

नवी संसद सृजनाचा आधार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नऊ वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही ऐतिहासिक वास्तू उभी राहिली याचा आनंद मला आहेच; परंतु त्याहीपेक्षा अधिक आनंद ४ कोटी लोकांना घरकुल दिल्याचा आहे.

11 कोटी घरांना शौचालय दिल्याचा, 4 लाख रस्ते बांधण्याचा आनंद मला अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण 25 वर्षांनी स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू, तेव्हा एक समर्थ भारत निर्माण झालेला जगाला दिसणे आवश्यक आहे. यासाठी या यज्ञात सर्वांनी प्रयत्नांची समीधा टाकावी.

आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षे पाठीमागे घेऊन जातोय की काय? अशी चिंता वाटू लागली आहे.

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी.

संसद देशवासीयांचा आवाज आहे, हे विसरून चालणार नाही. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप आक्षेपार्ह ठरले.

- राहुल गांधी, काँग्रेस नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com