Calangute to Baga Street Light Issue
Calangute to Baga Street Light IssueDainik Gomantak

Calangute to Baga Street Light Issue: बागा ते कळंगुट पथदिव्यांची बत्ती गुल, एक वर्षापासून GTDC चे दुर्लेक्ष

गेल्या वर्षी पंचायतीने पर्यटन विभाग आणि जीटीडीसीला लिहिलेल्या पत्राला अद्याप उत्तर नाही.
Published on

Calangute to Baga Street Light Issue: उत्तर गोव्यातील कळंगुट आणि बागा हे बीच पर्यटकांचे खास आकर्षण आहे. वर्षभर या दोन्ही ठिकाणी पर्यटकांची मोठी वदर्ळ पाहायला मिळते.

रात्री देखील पर्यटक बीचवर फेरफटका मारत असतात. मात्र, सतत गजबजलेल्या या कळंगुट आणि बागा बीच परिसरात पथदिवे मागील एक वर्षापासून बंद असल्याचे समोर आले आहे.

(Street-Lights erected by GTDC from the Baga circle to Calangute beach not working for more than a year)

गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) बागा सर्कल ते कळंगुट बीचपर्यंत उभारलेले पथदिवे वर्षापेक्षा अधिक काळपासून बंद आहेत. असे कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी म्हटले आहे.

याबाबत कळंगुट पंचायतीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पर्यटन विभाग आणि जीटीडीसीला पत्र देखील लिहिले होते. त्यात कळंगुट जंक्शनवरील पथदिवे आणि हाय-मास्ट दिवे दुरुस्त करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र, पत्राला कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे सरपंच सिक्वेरा म्हणाले.

Calangute to Baga Street Light Issue
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे पेट्रोल - डिझेलचे भाव

कळंगुट प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, पण सार्वजनिक रस्ते किंवा परिसरात विद्युत रोषणाई करण्याकडे पर्यटन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पर्यटन विभागाला लिहिलेल्या पत्राला, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

पंचायतीच्यावतीने दोन हाय मास्ट दिवे उभारले जाणार आहेत, मात्र त्याला वीज विभागाकडून मंजुरी मिळालेली नाही. असेही सरपंच सिक्वेरा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com