'भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही...'; ओवेसींच्या फेसबुक पोस्टवरुन नवा वाद

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एका पोस्टवरुन वाद सुरु झाला आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiDainik Gomantak
Published on
Updated on

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या एका पोस्टवरुन वाद सुरु झाला आहे. ओवेसी यांनी आपल्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे मुघल सम्राटांच्या पत्नी कोण होत्या असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ओवेसी यांच्या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अम्मू म्हणाले की, त्यांना हिंदूंच्या भावना भडकावायच्या आहेत. ओवेसींनी या विधानाद्वारे स्पष्ट केले आहे की, मुघलांनी केवळ लुटले नाही तर बहिणी-मुलींच्या इज्जतीशीही खेळ केला आहे.

दरम्यान, ज्ञानवापी मशीद, मथुरा-शाही ईदगाह, ताजमहाल आणि कुतुबमिनारवरुन देशात वाद पेटला आहे. यावेळी ओवेसी यांनी ज्ञानवापी प्रकरण औरंगजेबशी जोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रकरण बाहेर आले तर पुढे जाईल, असे ते म्हणाले होते. आता ओवेसी यांनी ही वादग्रस्त पोस्ट केली आहे. ओवेसी यांनी लिहिले की, भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी कोणताही संबंध नाही.

Asaduddin Owaisi
"भाजप मुस्लिमांना 'सामूहिक शिक्षा' देत आहे": असदुद्दीन ओवेसी

दुसरीकडे, आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी लिहिले की, भारतातील (India) मुस्लिमांचा मुघलांशी कोणताही संबंध नाही, पण मुघल सम्राटांच्या पत्नी कोण होत्या ते सांगा. तत्पूर्वी, गुजरातमधील (Gujarat) सुरतमध्ये एका सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी पुष्यमित्रांनी उद्ध्वस्त केलेल्या बौद्ध मंदिरांबद्दल भाजप का बोलत नाही, असे म्हटले होते.

Asaduddin Owaisi
ओवेसी हे तर भाजपचे 'अंडरगार्मेंट', सामनातून सेनेची खरमरीत टीका

भाजपचे प्रवक्ते म्हणाले - ओवेसी यांचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसते

दुसरीकडे, भाजपचे (BJP) प्रवक्ते आलोक अवस्थी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, अशा विधानांमुळे असदुद्दीन ओवेसी यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते. त्यांनी स्वत:वर उपचार करावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Girl Accidentally Drinks Acid Kanpur
Lieutenant General NS Raja Subramani New CDS
8th Pay Commission
Man Cuts Private Part Temple
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com