The 81-year-old murderer was finally arrested after absconding the police for four decades:
जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा खुन झाला होता. त्यानंतर आरोपी शिवराज सिंह सतत वेश बदलून आणि आपली ओळख लपवून 40 वर्षे पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र पोलिसांनी नुकतेच 81 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे.
फिरोजाबाद पोलिसांनी सिंह याला मध्य प्रदेशातील इंदूरमधील हिरा नगर येथून अटक केली, आता तो 81 वर्षांचा आहे, जेथे तो आपली ओळख लपवून मिठाईच्या दुकानात काम करत होता.
मे 1982 मध्ये, उत्तर प्रदेशातील रामगढ पोलीस ठाण्यांतर्गत थारपुथा परिसरातील रहिवासी असलेल्या बदन सिंह यांना जमिनीच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये बदन सिंह यांचा मृत्यू झाला.
शिवराजसह सात जणांना पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती. मात्र, त्या प्रत्येकाला जामीन मिळवण्यात यश आले.
खटल्यादरम्यान सहा आरोपींचा मृत्यू झाला, तर जामिनावर सुटलेला शिवराज घर आणि इतर मालमत्ता विकून बेपत्ता झाला होता.
रामगडचे एसएचओ रवी त्यागी म्हणाले, "कोर्टाने शिवराजविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पोलीस गेल्या चार दशकांपासून त्याचा शोध घेत होते. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक पोलिसांना आरोपीबाबत कोणतीही माहिती देत नव्हेत."
"अलीकडेच, आम्ही त्याच्या दोन विवाहित मुलींशी संपर्क साधला, ज्या दिल्ली आणि इंदूरमध्ये स्थायिक आहेत. त्यांच्याकडून गोळा केलेली माहिती आणि तांत्रिक संसाधनांचा वापर करून, शिवराजला अखेर शोधून अटक करण्यात आली," असे पुढे त्यागी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.