श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक सुरक्षा जवान शहीद झाला, तर दुसरा जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दल आणि पोलिसांना गुरिल्ला पद्धतीने लक्ष्य करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बडगाम जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी दोन पोलिसांची (Police) हत्या केली होती, जे सख्खे भाऊ होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका CRPF जवानाचा मृत्यू झाला आहे. याच्या काही तासांपूर्वी पुलवामामध्ये गैर-काश्मीरींवर हल्ला झाला होता, ज्यामध्ये दोन स्थलांतरित मजूर ठार झाले होते. त्याचवेळी, आजच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षा जवानांवर एमएसएचएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या एका चेक पॉइंटवर गोळीबार केला. मात्र सैनिक तयार होण्यापूर्वीच दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.
तसेच, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरु केली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांकडून अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. यापूर्वी पुलवामामध्ये (Pulwama) बिहारमधील दोन स्थलांतरित मजुरांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या 24 तासांत परप्रांतीय मजुरांवर दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे. मात्र, कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.