Tunisha Sharma Suicide: शीजान खानला 69 दिवसानंतर जामीन मंजूर

Tunisha Sharma Suicide: आता वसई कोर्टाने जवळजवळ 69 दिवसानंतर शीजान खानचा जामीन मंजूर केला आहे.
Tunisha Sharma
Tunisha SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Tunisha Sharma Suicide: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तिच्या आत्महत्येनंतर तुनिशाचा कोस्टार आणि एक्स बॉयफ्रेंड शीजान खानला पोलिसांनी अटक केली होती.

आता वसई कोर्टाने जवळजवळ 69 दिवसानंतर शीजान खानचा जामीन मंजूर केला आहे. त्याला अटक झाल्यापासून शीजान खानचे कुटुंब त्याला जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सातत्याने त्यांना अपयशाचा सामना करावा लागत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शीजान खानला जामीन मिळण्यासाठी वसई कोर्टाने 1 लाख रुपए सिक्युरिटी डिपॉजिट भरण्याचे आदेश दिले आहेत.

Tunisha Sharma
Threat to kill Salman Khan: सिद्धु मुसेवालाच्या कुटूंबासह सलमान खानला ठार मारण्याची धमकी

शीजान खानचे वकिल शरद राय यांनी म्हटल्यानुसार, शीजानला जामीन मिळण्याची अनेक कारणे आहेत. शीजानच्या विरोधात अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे असेही शरद राय यांनी म्हटले आहे.

शीजानला एक दिवस आधीच त्याला जामीन मिळाला असता मात्र कोर्टाच्या वेळेत पोहचू न शकल्याने एक दिवस उशीरा त्याला जामीन मिळाला असे शरद राय यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तुनिशा शर्मा आणि शीजान खान अलिबाबा दास्ता ए काबुल या मालिकेत एकत्र काम करत होते. ते रिलेशनशिपमध्येही होते. मात्र काही कारणांमुळे त्यांनी ब्रेकअप केले होते. याच कारणामुळे तुनिशा नैराश्याचा सामना करत होती.

तिच्या आत्महत्येला शीजान जबाबदार आहे असे आरोप तुनिशाच्या आईने शीजानवर लावले होते. याबरोबरच शीजानविरुद्ध केस दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शीजानला 26 डिसेंबरला अटक केली होती.

शीजान खानला जामीन मिळाला असला तरीही कोर्टाने त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. विदेशात जाण्याला सक्त मनाई केली आहे. याबरोबरच कामानिमित्त जायचे असल्यास कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com