पंजाबच्या निवडणुकांवर यूपी-बिहारच्या मतदारांचा प्रभाव! ही आहे आकडेवारी

2017 मध्ये, लुधियाना जिल्ह्यात 5 विधानसभा जागा होत्या जिथे स्थलांतरित मतदारांचे वर्चस्व होते, त्यापैकी तीन काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर एक लोक इन्साफ पक्षाने आणि एक शिरोमणी अकाली दलाने जिंकली होती.
Charanjit Singh Channi statement in up,bihar labour
Charanjit Singh Channi statement in up,bihar labourDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाब काँग्रेसमध्ये आधीच गदारोळ होता. पक्ष अजूनही त्यातून सावरला नाही, त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी यूपी-बिहारच्या लोकांबाबत विधान केले, त्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हे विधान केले तेव्हा त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही उपस्थित होत्या आणि त्यांनी टाळ्या वाजवून चरणजीत सिंह चन्नी यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. तर दुसरीकडे प्रियांका गांधी स्वत: उत्तर प्रदेशात मरणासन्न असलेल्या काँग्रेसला पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.(Charanjit Singh Channi statement in up,bihar labour)

Charanjit Singh Channi statement in up,bihar labour
PFI वर तात्काळ बंदी घाला: मुख्यमंत्री सरमा

मुख्यमंत्री चन्नी यांचे हे विधान विधानसभा निवडणुकीच्या वेळी आले तेव्हा त्याचे निवडणुकीतील फायदे-तोटेही दिसणे साहजिकच आहे. असा प्रश्न उपस्थित होऊ लागला की, पंजाबमध्ये एवढ्या स्थलांतरित मतदारांची संख्या आहे का की ते पंजाबमधील (Punjab) विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतील? पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी समाजात दुरावा निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याने हीच भीती निर्माण हेत आहे.

पंजाबमध्ये किती स्थलांतरित आहेत?

पंजाब हे कृषीप्रधान राज्य आहे. इथे लोकसंख्येनुसार इतर राज्यांपेक्षा जास्त जमीन आहे, त्यामुळे शेतीही जास्त आहे हे उघड आहे. जर लागवड जास्त असेल तर पेरणी आणि काढणीसाठी अधिक लोकांची गरज भासेल. 1970 च्या दशकात जेव्हा हरितक्रांती सुरू झाली तेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमधून मोठ्या संख्येने मजूर पंजाबच्या ग्रामीण भागात स्थलांतरित होऊ लागले.

2016 मध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप सरकारच्या प्रवासी शाखेने एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात समोर आलेल्या अहवालानुसार पंजाबमधील स्थलांतरितांची अंदाजे संख्या 39 लाख होती, जी गेल्या काही वर्षांत 43 लाखांवर पोहोचली आहे. 2020 बद्दल बोलायचे तर, संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना सुमारे 18 लाख स्थलांतरित मजुरांनी त्यांच्या घरी परत जाण्यासाठी पंजाब सरकारकडे नोंदणी केली होती. यामध्ये 10 लाख मजूर उत्तर प्रदेशातील आणि 6 लाख बिहारमधील होते. उर्वरित कामगार हे देशातील इतर राज्यातील होते.

स्थलांतरित मजुरांचा राजकीय प्रभाव

2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये सुमारे 27 लाख स्थलांतरित मतदार उपस्थित होते. ही व्होट बँक पंजाबभर पसरलेली असली तरी. स्थलांतरित मतदारांची सर्वाधिक संख्या पंजाबच्या साहनेवाल विधानसभा मतदारसंघात आहे, जिथे त्यांची लोकसंख्या 50,000 पेक्षा जास्त आहे. स्थलांतरित मतदारांचा प्रभाव फगवाडा, होशियारपूर, भटिंडा, जालंधर, अमृतसर, लुधियाना आणि फतेहगढ साहिब या जिल्ह्यांमध्येही दिसून येतो. 2017 मध्ये, लुधियाना जिल्ह्यात 5 विधानसभा जागा होत्या जिथे स्थलांतरित मतदारांचे वर्चस्व होते, त्यापैकी तीन काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर एक लोक इन्साफ पक्षाने आणि एक शिरोमणी अकाली दलाने जिंकली होती.

यूपी बिहारच्या मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न

शिखांच्या बालेकिल्ल्यातील पंजाबमधील नेते यूपी-बिहारच्या (Bihar) लोकांना केंद्रस्थानी ठेवून स्थानिक धोरणे ठरवतात हा स्थलांतरित मतदारांचा प्रभाव आहे. मनोज तिवारी, शत्रुघ्न सिन्हा या अभिनेत्यांनाही निवडणूक प्रचारासाठी पाचारण करण्यात आले आहे. पंजाब सरकारनेही या स्थलांतरित मतदारांचा पवित्र सण छठ पूजेची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. राजकीयदृष्ट्या, पंजाबमध्ये आतापर्यंत असा एकही स्थलांतरित नेता झालेला नाही जो मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा आमदार झाला असेल.

मात्र महापालिका निवडणुकीत त्यांची उपस्थिती निश्चितच दिसून येते. 2018 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस (Congress), आम आदमी पार्टी आणि लोक इन्साफ पक्षाने एका स्थलांतरित उमेदवाराला तिकीट दिले होते. लुधियाना महानगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत स्थलांतरित समुदायाचे 3 नगरसेवक विजयी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com