IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

Team India Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना भारतीय संघाने 48 धावांनी जिंकला.
Team India Record
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Team India Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना भारतीय संघाने 48 धावांनी जिंकला. या विजयासह सूर्या ब्रिगेडने मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आणि अभेद्य आघाडी घेतली. गोल्ड कोस्ट (Gold Coast) येथे झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्येही वर्चस्व गाजवले.

भारताचा ऐतिहासिक विजय आणि नवा विक्रम

168 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 18.2 षटकांत केवळ 119 धावांवर ढेर झाला. या विजयासह टीम इंडियाने केवळ मालिका जिंकण्याची दावेदारी पक्की केली नाही, तर एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करण्याचा भारताचा (India) हा दुसरा विक्रम ठरला. यापूर्वी, 2020 मध्ये कॅनबेरा येथे 162 धावांचा यशस्वी बचाव करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.

Team India Record
IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

ऑस्ट्रेलियातील सर्वात कमी यशस्वीरित्या डिफेंड केलेले लक्ष्य

  • 162 धावा: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कॅनबेरा (2020)

  • 168 धावा: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गोल्ड कोस्ट (2025)

  • 179 धावा: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कॅनबेरा (2022)

Team India Record
IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या नावावर 'लाजिरवाणा' विक्रम

या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या (Australia) नावावर एक लाजिरवाणा विक्रमही जमा झाला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरच्या मैदानावरचा हा दुसरा सर्वात कमी स्कोर ठरला.

ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर सर्वात कमी टी20 आंतरराष्ट्रीय स्कोर

  • 111 विरुद्ध न्यूझीलंड, सिडनी (2022)

  • 119 विरुद्ध भारत, गोल्ड कोस्ट (2025)

  • 127 विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न (2010)

Team India Record
IND vs AUS Semifinal: हरमनप्रीत कौरची चूक क्रांती गौडने सावरुन घेतली! एलिसा हिलीचा कॅप्टनने सोडलेला झेल, पण गोलंदाजाने केली कमाल VIDEO

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली

भारताने दिलेल्या 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्णपणे ढेपाळला. भारताच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 18.2 षटकांत केवळ 119 धावांवर ऑलआऊट झाला. सलामीवीर मिचेल मार्श याने 24 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या, तर मॅथ्यू शॉर्टने 19 चेंडूंमध्ये 25 धावांची खेळी खेळली. मात्र, त्यानंतर जोश इंग्लिस (12), टिम डेव्हिड (14) आणि जोश फ्लिप (10) यांसारख्या खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील खेळाडूंनी निराशा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com