
Yashasvi Jaiswal Big Statement: टीम इंडियात आता मोठे बदल होताना दिसत आहेत. बीसीसीआय (BCCI) आणि निवड समितीकडून शुभमन गिलला (Shubman Gill) कसोटी आणि वनडे (ODI) सामन्यांसाठी कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले, तर टी-20 मध्ये सूर्यकुमार यादव आपले कर्णधारपद कायम राखणार आहे. अशातच, आता टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनेही (Yashasvi Jaiswal) कर्णधारपदासाठी आपला दावा ठोकत सोशल मीडियावर लक्ष वेधले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असलेला यशस्वी जैस्वाल आता वनडे संघाचाही महत्त्वाचा भाग बनला आहे. सध्याच्या घडीला जैस्वाल तिन्ही फॉरमॅटसाठी निवड समितीच्या शर्यतीत असतो. याच दरम्यान, त्याने कर्णधारपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केली आहे. राज शामानीच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत जैस्वालने कर्णधारपदाबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, “मी रोज स्वतःवर काम करतो, जेणेकरुन मी एक लीडर म्हणून उदयास येऊ शकेन. मला पण कर्णधार बनायचे आहे.”
विशेष म्हणजे, यशस्वीने आपण टीम इंडियाचा (Team India) कर्णधार बनू इच्छितो की, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, त्याच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
यशस्वी जैस्वाल गेल्या काही काळापासून कर्णधारपदाचे संकेत देत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) तो मुंबईसाठी खेळतो, पण मधल्या काळात त्याने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही त्याच्या या निर्णयामागे कर्णधारपदाची इच्छा असल्याचे बोलले जात होते. मात्र, काही काळानंतर तो पुन्हा मुंबई (Mumbai) क्रिकेटमध्ये परतला.
याव्यतिरिक्त, आयपीएल 2025 (IPL 2025) दरम्यानही अशा बातम्या आल्या होत्या की, जैस्वाल त्याच्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) फ्रँचायझीवर खूश नाही. कर्णधार संजू सॅमसन अनुपस्थित असताना जैस्वालला स्वतःला संघाचे नेतृत्व करताना पाहायचे होते. परंतु, राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाने ही जबाबदारी रियान परागकडे सोपवली होती.
जैस्वालचे वारंवार कर्णधारपदाबद्दल बोलणे आणि आता पॉडकास्टवर थेट इच्छा व्यक्त करणे, हे भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यात नेतृत्वासाठी अनेक युवा खेळाडू शर्यतीत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.