केरळच्या 50 हून अधिक मुलींसोबत शिक्षकाने केले गैरवर्तन, फरार आरोपीचा तपास सुरू

के.व्ही. शशीकुमार विरुद्ध पहिले प्रकरण समोर आले जेव्हा एका विद्यार्थिनीने फेसबुक पोस्टद्वारे त्याच्यावर आरोप केले.
Teacher abuses more than 50 girls in Kerala
Teacher abuses more than 50 girls in KeralaDainik Gomantak
Published on
Updated on

केरळच्या मलप्पुरम येथे माजी शिक्षक के.व्ही. शशीकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. शशीकुमारवर गेल्या 30 वर्षांमध्ये 50 हून अधिक मुलींबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. सध्या राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Teacher abuses more than 50 girls in Kerala)

Teacher abuses more than 50 girls in Kerala
Mundka Fire: जीव वाचवण्यासाठी फोडल्या काचा, अनेकांनी मारल्या वरून उड्या

मिळालेल्या माहितीनुसार, सीपीएम नेते केव्ही शसीकुमार मलप्पुरममधील एका खाजगी शाळेत शिक्षक होते. याशिवाय ते मलप्पुरम नगरपरिषदेचे सदस्यही होते. मार्च 2022 रोजी ते निवृत्त झाले.

50 मुलींनी दाखल केली तक्रार
के.व्ही. शशीकुमार विरुद्ध पहिले प्रकरण समोर आले जेव्हा एका विद्यार्थिनीने फेसबुक पोस्टद्वारे त्याच्यावर आरोप केले. यानंतर 50 हून अधिक विद्यार्थिनींनी आरोपीविरुद्ध पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतरच शशीकुमार फरार झाला.

Teacher abuses more than 50 girls in Kerala
दिल्लीतील मुंडका इमारतीला भीषण आग, 27 जणांचा मृत्यू

शाळा व्यवस्थापनावरही आरोप
याप्रकरणी विद्यार्थिनींनीही शाळा व्यवस्थापनावर आरोप केले आहेत. विद्यार्थिनींनी सांगितले की, त्यांनी 2019 मध्येही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र शाळा व्यवस्थापनाकडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या हे प्रकरण समोर आल्यानंतर सीपीएमने शशीकुमार याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com