दिल्लीतील मुंडका इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या मजल्यावर तपास अजून सुरू आहे. या इमारतीत सध्या अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. इमारतीत अडकलेल्या 9 जखमींना संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंडका परिसरात लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. इमारतीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (delhi fire breaks out in mundka building many people trapped woman died)
आज दुपारी 04.45 वाजता कार्यालयात आग लागल्याच्या घटनेबाबत मुंडका पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला. कॉलवर माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाऱ्यांनी इमारतीच्या खिडक्या तोडून लोकांना बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की ही इमारत तीन मजली आहे आणि सामान्यतः कंपन्यांना कार्यालयाची जागा देण्यासाठी वापरण्यात येणारी व्यावसायिक इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून आगीच्या घटनेला सुरुवात झाली. कंपनीचा मालक पोलिसांच्या ताब्यात आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण 9 गाड्या घटनास्थळी आहेत. तातडीने मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी आहे. उन्हाळ्यात वारंवार आगी लागण्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र ही आग कशामुळे लागली, कारण काय, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.