E-Passport : आता तुमच्या पासपोर्टमध्ये लावण्यात येणार इलेक्ट्रॉनिक चिप

भारत लवकरच ई-पासपोर्ट (E-Passport) जारी करणार आहे. ज्यामध्ये रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) आणि बायोमेट्रिक्स वापर करण्यात येणार आहे.
Passport
PassportDainik Gomantak

भारत लवकरच ई-पासपोर्ट जारी करणार आहे. ज्यामध्ये रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) आणि बायोमेट्रिक्स वापर करण्यात येणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी गेल्या आठवड्यात ट्विट करुन ही माहिती दिली होती. त्यांनी ट्विटरवर सांगितले की, नवीन ई-पासपोर्ट बायोमेट्रिक डेटा सुरक्षित करेल. तसेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या मानकांनुसार असणार आहे. तर दुसरीकडे सरकारचा दावा आहे की, ई-पासपोर्ट (Passport) सेवा सुरु केल्याने, भारताची अशी पासपोर्ट सेवा प्रदान करणाऱ्या निवडक देशांच्या यादीत समावेश होईल. (India Will Soon Issue An E Passport That Will Use Radio Frequency Identification And Biometrics)

ई-पासपोर्टमध्ये काय खास असेल, कसे चालेल

भारत सरकार (India Government) आपल्या नागरिकांसाठी संपूर्ण नवीन पासपोर्ट प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. हे बायोमेट्रिक पासपोर्ट चिप सक्षम पासपोर्ट असतील. या पासपोर्टवर लोकांना बायोमेट्रिक डेटा टाकावा लागेल. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकार चिप- इनेबल्ड ई-पासपोर्ट लॉन्च करेल जे बायोमेट्रिक डेटासह सुरक्षित असेल. नवीन ई-पासपोर्ट प्रवाशांना जगभरातील इमिग्रेशन पोस्टमधून सहजतेने जाण्यास मदत करतील. हा पासपोर्ट बनावटगिरी रोखण्यास सक्षम असणार आहे. पासपोर्टमधील चिपमध्ये कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचा शोध संबंधित यंत्रणेकडून घेण्यात येईल.

तसेच, भारताने यापूर्वीच सुमारे 20 हजार अधिकृत आणि राजनैतिक ई-पासपोर्ट जारी केले आहेत, ज्यात इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिप आहे. सध्या तो पायलट प्रोजेक्टचा भाग आहे. आतापर्यंत भारतीय नागरिकांना प्रिंटेड बुकलेट पासपोर्ट दिले जात होते.

ई-पासपोर्टचे फायदे

  • ई-पासपोर्ट बायोमेट्रिक डेटासह सुरक्षित केला जाईल.

  • पासपोर्ट सुरक्षेच्या दृष्टीनेही हे पूर्वीपेक्षा चांगले असेल.

  • ई-पासपोर्ट आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (IACO) मानकांनुसार असेल.

  • ई-पासपोर्टवरील चिप रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) द्वारे अनधिकृत डेटा प्रतिबंधित करेल.

  • ई-पासपोर्ट ओळख चोरी आणि बनावटगिरी रोखण्यासाठी देखील मदत करेल.

शिवाय, पासपोर्ट रँकिंगबद्दल बोलायचे झाल्यास, 2022 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत 83 व्या क्रमांकावर आहे. भारताने शेवटच्या 90 व्या स्थानावरुन आपले रँकिंग सुधारण्यात यश मिळविले आहे, तर जपान (Japan) आणि सिंगापूर (Singapore) या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com