Viral Video: बाईकवर स्टंट करत फटाके फोडणे पडले महागात, पोलिसांनी 10 जणांना केली अटक

Tamil Nadu Viral Video: तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून दिवाळी सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
Tamil Nadu Viral Video
Tamil Nadu Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Tamil Nadu Viral Video: तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून दिवाळी सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. यामध्ये काही मुले बाईकवर स्टंट करताना फटाके फोडत आहेत. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. बॅकग्राऊंडमध्ये संगीतही वाजत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार त्याचे पुढचे चाक हवेत उचलतो आणि त्याच्या हँडलजवळ ठेवलेले फटाके फुटले. दुसरा मुलगा बाईकच्या मागे बसला आहे आणि त्याच्या हातात फटाक्यांची माळ आहे. तो फटाक्यांची माळ हवेत फिरवू लागतो. त्यासोबत दुचाकीवरुन आलेली दोन मुले त्यांच्या मोबाईलवरुन व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्रिचीचे एसपी डॉ. वरुण कुमार यांनी याबाबत एएनआयला अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, 'त्रिची जिल्हा पोलिसांनी रस्त्यावर स्टंटबाजी केल्याबद्दल आयपीसी आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत 10 जणांना अटक केली आहे.

हे लोक ज्या प्रकारचे स्टंट करत होते त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. खरे तर, व्हिडिओ समोर आल्यानंतर इंटरनेट यूजर्संनी याबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.

विशेष म्हणजे, त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. यानंतर पोलीसांनीही (Police) या प्रकरणी आपली सक्रियता दाखवली.

Tamil Nadu Viral Video
Tamil Nadu Bus Accident: चेन्नई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 5 ठार, 60 जखमी

राज्यात 2,246 जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला

दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशांनुसार निर्धारित दोन तासांच्या मर्यादेपेक्षा जास्त फटाके फोडल्याप्रकरणी 2,206 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राज्य पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.

सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त फटाके फोडल्याबद्दल 2,246 लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आल्याचे राज्य पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धीनुसार, एकूण 2,905 लोकांना अटक करण्यात आली आणि नंतर पोलिसांनी त्यांची जामिनावर सुटका केली. पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण राज्यात सुमारे 2200 गुन्ह्यांपैकी सर्वाधिक 568 प्रकरणे चेन्नईमध्ये नोंदवण्यात आली आहेत. 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात दिवाळी सण साजरा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com