Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Fireworks factory big explosion: तामिळनाडूतील शिवकाशी येथे गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली.
Fireworks Factory Big Explosion
Fireworks Factory Big ExplosionPTI

Fireworks factory big explosion: तामिळनाडूतील शिवकाशी येथे गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. या स्फोटात 12 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना बाहेर काढण्यात आणि रुग्णालयात नेण्यात बचाव पथक व्यस्त आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त आहेत. पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. कारखाना परवानाधारक युनिट होता. स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे.

दरम्यान, विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी येथे एका निर्जन ठिकाणी फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. दररोजच्याप्रमाणे गुरुवारीही कारखान्यात फटाके बनवण्याचे काम सुरु होते. कामगार कामात व्यस्त होते. दरम्यान अचानक कारखान्यात ठेवलेल्या फटाक्याचा स्फोट झाला. स्फोट होताच कारखान्यात हलकल्लोळ उडाला. कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या लोकांनी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

Fireworks Factory Big Explosion
Tamil Nadu Heavy Rainfall: तामिळनाडूत पावसामुळे हाहाकार… 800 प्रवाशांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरु

फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला

कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवून कारखान्यात बचावकार्य सुरु केले. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या पथकाला एकूण आठ मृतदेह सापडले असून त्यापैकी पाच मृतदेह महिलांचे आणि तीन पुरुषांचे आहेत. काही जखमीही आहेत, ज्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी जयसेलन आणि विरुधुनगर जिल्ह्याचे एसपीही घटनास्थळी पोहोचले.

Fireworks Factory Big Explosion
Tamil Nadu Crime News: इथं क्रूरताही ओशाळली... गर्लफ्रेंडला मारुन मृतदेहाचा फोटो ठेवला व्हॉट्सअप स्टेटस!

जिल्हाधिकारी जयसेलन घटनास्थळी पोहोचले

जिल्हाधिकारी जयसेलन आणि एसपी यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी जयसेलन यांनी सांगितले की, फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. आणखी काही लोक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हाधिकारी जयसेलन यांनी सांगितले की, फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट कसा झाला याचा तपास सुरु आहे. सध्या आमचे संपूर्ण लक्ष कारखान्यातील आग विझवण्यावर आहे. पोलीस आणि अग्निशमन दल बचाव कार्यात गुंतले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com