Tamil Nadu Governor RN Ravi Gun Remark: तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. जशास तसे उत्तर देण्यासाठी भारत तयार आहे, असे ते म्हणाले आहेत. देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लोकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद होऊ नये, असेही ते म्हणाले.
दरम्यान, रविवारी कोचीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल आरएन रवी म्हणाले, "हिंसेविरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका असली पाहिजे. जो कोणी शस्त्राचा वापर करले त्याला शस्त्रानेच उत्तर दिले जाईल. तसेच, जे देशाच्या एकतेच्या आणि अखंडतेच्या विरोधात बोलतात, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करु नये. आठ वर्षांत कोणत्याही सशस्त्र गटाशी शरणागती पत्करण्याची चर्चा झालेली नाही.''
दुसरीकडे, राज्यपालांनी आधीच्या यूपीए सरकारला कोंडीत पकडले. आरएन रवी म्हणाले, '26/11 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तेव्हा संपूर्ण देश दुखावला गेला. मूठभर अतिरेक्यांनी देशाची बदनामी केली. हल्ल्याच्या 9 महिन्यांच्या आत, आपले तत्कालीन पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी एका संयुक्त करारावर स्वाक्षरी केली होती. ज्यामध्ये म्हटले होते की, दोन्ही देश दहशतवादाचे (Terrorism) बळी आहेत. हे काय आहे? आम्ही स्पष्ट आहोत? आमच्यात वैर आहे का? पाकिस्तान मित्र आहे की शत्रू हे स्पष्ट झाले पाहिजे. पुलवामा (Pulwama) हल्ल्यानंतर आम्ही पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई दलाने प्रत्युत्तर दिले. जर तुम्ही दहशतवादी कारवाया कराल तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल.'
आरएन रवी पुढे म्हणाले की, 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींपासून (Atal Bihari Vajpayee) ते पंतप्रधान मोदींपर्यंत 'अमन की आशा' अंतर्गत पाकिस्तानशी (Pakistan) संबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या बदल्यात आपल्याला काय मिळाले, कारगिल, उरी हल्ला आणि नंतर पुलवामा हल्ला, सिलसिला इथे थांबला नाही.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.