पाकिस्तानात युध्दकैदी असणाऱ्या मेजर सिंग यांच्या सुटकेवर SC ने मागितले उत्तर

पाकिस्तानने 1971 पासून ताब्यात घेतलेले युद्धकैदी (PoW) मेजर कंवलजीत सिंग यांच्या पत्नीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak

पाकिस्तानने (Pakistan) 1971 पासून ताब्यात घेतलेले युद्धकैदी (PoW) मेजर कंवलजीत सिंग यांच्या पत्नीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. मेजर कंवलजीत सिंग (Major Kanwaljit Singh) यांच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरु होती, ज्यामध्ये त्यांनी पतीच्या सुटकेची मागणी केली होती. (Supreme Court seeks reply from Center on the release of Major Kanwaljit Singh a prisoner of war in Pakistan)

खरं तर 71 च्या युद्धात अनेक भारतीय सैनिकांना पाकिस्तानने (Pakistan) कैद केले होते. ज्यामध्ये जसबीर कौर यांचे पती मेजर कंवलजीत सिंह यांचाही सहभाग होता. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'ही महत्त्वाची बाब आहे.' त्याचवेळी, याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले की, 'कारवाईचे कारण गेल्या 50 वर्षांपासून अस्तित्वात आहे. आता या प्रकरणावर तीन आठवड्यांनंतर सुनावणी होत आहे.' खरं तर, मेजर कंवलजीत सिंग यांच्या पत्नी जसबीर कौर यांनी याचिकेत म्हटलयं की, '54 युद्धबंदी पाकिस्तान सरकारने अजूनही बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहेत.'

Supreme Court
पाकिस्तान संसदेने पंतप्रधान इम्रान खान विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला

दरम्यान, याचिकेत या युद्धबंदींची सुटका करण्याची, तसेच युद्धबंदीच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यंत्रणा स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत कॅप्टन सौरभ कालिया आणि चार जाट रेजिमेंट सैनिकांच्या हत्येचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यांचे मृतदेह पाकिस्तानने परत केले होते. याचिकेत असेही म्हटले आहे की, 'भारतीय जवान जवळपास 50 वर्षांपासून हलाखीचे जीवन जगत आहेत.' तर दुसरीकडे भारत सरकारने दावा केला आहे की, 'युद्धबंदींच्या सुटकेसाठी आम्ही काम करत आहोत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com