Lakhimpur Kheri: 'आम्ही तुमच्या तपासावर समाधानी नाही'

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) लखीमपूर खेरी प्रकरणाच्या तपासात उत्तर प्रदेश सरकारने उचललेल्या पावलांवर समाधानी नसल्याचे म्हटले आहे.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी लखीमपूर खेरी (Lakhimpur Kher) प्रकरणावर सुनावणी केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने लखीमपूर खेरी प्रकरणाच्या तपासात उत्तर प्रदेश सरकारने उचललेल्या पावलांवर समाधानी नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणी कठोर टिप्पणी करताना म्हटले की, जर आरोपी सामान्य माणूस असतो तर त्याला अशी सूट मिळाली असती का? केवळ स्थानिक अधिकाऱ्यांना एसआयटीमध्ये ठेवण्यात आले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणे योग्य होणार नाही. आम्हाला इतर काही गोष्टींचा धांडोळा घ्यावा लागेल. डीजीपी तुम्ही या प्रकरणातील पुरावे सुरक्षित ठेवा. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात हजर राहीले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, आशिष मिश्रा उद्या हजर होतील. त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला विचारले की, या प्रकरणात गंभीर आरोप असतानाही आरोपींना असे वागवले जाते का? या प्रकरणात आठ लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. न्यायालयाने पुढे म्हटले की, या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, आम्हाला आशा आहे की, यूपी सरकार या प्रकरणासंबंधी आवश्यक पावले उचलेल. यापूर्वी गुरुवारी न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला आज या प्रकरणी स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले होते की, किती लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि कोणाला अटक करण्यात आली.

Supreme Court
लखीमपूर खेरी प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव करणार चौकशी

सीजेआय एन व्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला सांगितले होते की, ते स्टेटस रिपोर्टमध्ये उद्या सांगतील की कोणाच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे की नाही. यासह, हिंसाचारात आपला मुलगा गमावलेल्या आजारी आईच्या तातडीने उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेशही यूपी सरकारला दिले होते.

4 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान चार शेतकरी आणि एका पत्रकारासह आठ जणांचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारले, तर दुसऱ्या बाजूचे म्हणणे आहे की, निदर्शनादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि या गोंधळात वाहने अनियंत्रित झाली. आणि अपघात झाला.

Supreme Court
लखीमपूर खेरी हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल; उद्या सुनावणी

लखीमपूर खेरी प्रकरणी नोंदवलेल्या खून अहवालातील मुख्य आरोपी केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा याच्या घरी पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा नोटीस लावली. ज्यामध्ये त्याला शुक्रवारी पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर समन्स बजावण्यात आला आहे. या संभाषणादरम्यान पोलीस मोनूला अटक करेल की चौकशीनंतर त्याची सुटका करेल हे पाहिले जाईल. या चौकशीवर देशभरातील प्रसारमाध्यमांची नजर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com