‘तुम्ही मला माय लॉर्ड म्हणणे बंद करा, मी तुम्हाला अर्धा पगार देईन…’ SC मध्ये न्यायमूर्तींनी अशी का टिप्पणी केली?

Supreme Court: न्यायालयांमध्ये वकील न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणून संबोधतात.
Supreme Court
Supreme CourtDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Supreme Court Judge Comment on Lawyer Stop Calling My Lord: न्यायालयांमध्ये वकील न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणून संबोधतात, मात्र गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान वकीलाने 'माय लॉर्ड' असे संबोधल्याने न्यायाधीश संतापले. त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की, जर तुम्ही मला माय लॉर्ड म्हणणे बंद केले तर मी तुम्हाला माझा अर्धा पगार देईन.

दरम्यान, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्यासमवेत सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती पीएस नरसिंह यांनी एका ज्येष्ठ वकिलाला विचारले की, तुम्ही मला किती वेळा माय लॉर्ड्स म्हणणार? तुम्ही मला हे म्हणणे बंद केले तर मी तुम्हाला माझा अर्धा पगार देईन. माय लॉर्ड ऐवजी तुम्ही मला सर म्हणा. नाहीतर तुम्ही 'माय लॉर्ड' हा शब्द किती वेळा उच्चारलात ते मी मोजू लागेन, असे न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले.

Supreme Court
Supreme Court: समलिंगी विवाहाला कायदेशीर अधिकार मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निर्णय!

ब्रिटिश काळापासूनची परंपरा

न्यायालयात वकील न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणून संबोधतात. ब्रिटिश काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे. विशेष म्हणजे, 2006 मध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाने एक ठराव संमत केला होता, ज्यामध्ये कोणताही वकील न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणून संबोधणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रस्ताव मंजूर होऊन 17 वर्षे उलटली तरी अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.