Sunil Gavaskar Birthday
Sunil GavaskarDainik Gomantak

Sunil Gavaskar Net Worth: गोव्यात आलिशान व्हिला, दुबईत कोट्यवधींची संपत्ती अन् महागड्या गाड्यांचा शौक; जाणून घ्या सुनील गावस्करांची नेटवर्थ

Sunil Gavaskar Birthday: टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर 76 वर्षांचे झाले.
Published on

Sunil Gavaskar Birthday: टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर 76 वर्षांचे झाले. 10 जुलै 1949 रोजी जन्मलेल्या गावस्कर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले. गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावांचा टप्पा गाठणारे पहिले खेळाडू होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची 34 शतके आहेत, जी दीर्घकाळ एक जागतिक विक्रम होती. तसेच, त्यांनी केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर क्रिकेटच्या आधारेही कोट्यवधींची मालमत्ता कमावली. त्यांच्याकडे देशातच नव्हे तर परदेशातही अनेक मालमत्ता आहेत. चला तर मग बीसीसीआयकडून मिळालेल्या त्यांच्या एकूण संपत्ती, घर आणि पेन्शनबद्दल जाणून घेऊया...

सुनील गावस्कर यांची एकूण संपत्ती

सुनील गावस्कर यांची एकूण संपत्ती 250 कोटींपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते. अहवालानुसार, गावस्कर हे क्रिकेट समालोचनातून सर्वाधिक पैसे कमवतात. गावस्कर आयसीसी आणि आयपीएल समालोचनमधून सुमारे 30 ते 36 कोटी रुपये कमवतात. बीसीसीआयशी संबंधित सामन्यांच्या करारातूनही त्यांना 6 कोटी रुपये मिळतात. इतकेच नाहीतर बीसीसीआय गावस्कर यांना पेन्शन देखील देते. बीसीसीआय (BCCI) पेन्शन योजनेअंतर्गत 75 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना दरमहा 70 हजार पेन्शन मिळते.

Sunil Gavaskar Birthday
Sunil Gavaskar Luxurious Villa: सुनिल गावसकरांचा गोव्यातील आलिशान 'व्हिला'!

तसेच, गावस्कर अनेक मोठ्या ब्रँडसाठी जाहिराती देखील करतात. जगातील सर्वात मोठ्या बॅट कंपन्यांपैकी एक असलेल्या एसजी (Sanspareils Greenlands) चा त्यांच्याशी करार आहे. व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, ते भारतातील पहिल्या क्रीडा व्यवस्थापन फर्म पीएमजीचे सह-संस्थापक आहेत. याशिवाय, त्यांनी बिन्का गेम्स सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. गावस्कर यांनी मुंबई आणि गोव्यात रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

Sunil Gavaskar Birthday
Sunil Gavaskar: गावसकरांच्या कुटुंबावर पसरली शोककळा; लाईव्ह सामन्यातील समालोचन सोडून अचानक कानपूरला रवाना

सुनील गावस्कर यांचे घर आणि गाड्या

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचे मुंबईत सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. तसेच, गोव्यातील असागाव येथे त्यांचा एक आलिशान व्हिला आहे, ज्याची किंमत सुमारे 20 कोटी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, गावस्कर यांची दुबईमध्येही मालमत्ता आहे. त्यांचे घर दुबईतील पाम जुमेराहच्या पॉश भागात आहे. गावस्कर यांच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू 5-सीरीज आणि 7-सीरीजचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com